राजगड बालेकिल्ला - Rajgad Fort
राजगड बालेकिल्ला - Rajgad Fort

गिरिदुर्गांचे आठ प्रकार

तंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरीदुर्गांची माहिती दिली आहे. डॉ. गोडे यांनी या ग्रंथा बाबत तपशीलवार माहिती प्रसिध्द केली आहे. सुई सारख्या निमुळत्या आकाराचा, माणसाच्या आकाराचा, सुपाच्या आकाराचा, मध्ये तुटलेला, वाकडा तिकड़ा, नांगरा सारखा असे किल्ले राजाला राहण्यास योग्य नाहित असे नमूद केलेले आहे. याच ग्रंथात भद्र, अतिभाद्र, चंद्र, अर्ध-चंद्र, नाभ, सुनाभ, रुचिर, वर्धमान असे डोंगरी किल्ल्यांचे आठ उप प्रकार सांगितले आहेत.

१) भद्र गिरिदुर्ग म्हणजे जो वर्तुळाकृती स्निग्ध आणि पर्वताच्या उंच पण सपाट पठारी शिखरावर आहे. तेथे पाणीही भरपूर आहे. अशा ठिकाणी राजा हत्तीवर बसून ध्वज पताका घेउन वर जाऊ शकतो.
२) अतिभद्र गिरिदुर्ग म्हणजे ज्या डोंगराचे टोक खुप ऊंच चौकोनी, विस्तीर्ण व जल समृद्ध आहे अशा डोंगर शिखरावर बांधलेला किल्ला.
३) चंद्र गिरिदुर्ग म्हणजे पायथ्या पासून वर चढण्याचा मार्ग अवघड आहे, ज्याचे शिखर मोठे पण चंद्राकृती असते व जेथे भरपूर पाणी असते असा डोंगरी किल्ला.
४) अर्ध चंद्र गिरिदुर्ग म्हणजे ज्याचा पायथा व शिखर अर्धचंद्राकृती आहेत. जो मध्यम उंचीचा पण उत्तम पाण्याचा भरपूर साठा आहे असा डोंगरी किल्ला.
५) नाभ गिरिदुर्ग म्हणजे कमळाच्या फुलासारखा विकसित झालेला ज्याचा आकार आहे असा किल्ला.
६) सुनाभ गिरिदुर्ग हा पायथ्याशी पुरेसा रुंद व वर क्रमाक्रमाने निमुळता होत गेलेला डोंगरी किल्ला.
७) रुचिर गिरिदुर्ग पायथ्यापासून वरपर्यंत लहान मोठ्या पायऱ्या बांधलेल्या आहेत असा किल्ला.
८) वर्धमान गिरिदुर्ग वैशिष्ट म्हणजे तो अर्ध गोलाकार डोंगरावर वसविलेला किल्ला.

आज मितिस अशा सर्व प्रकारचे सर्व किल्ले अचुकपणे दाखविता येत नाहीत याची नोंद घ्यावी.

संदर्भ: अथातो दुर्गजिज्ञासा – प्र. के. घाणेकर
छायाचित्र: रुपेश कांबळे

तंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरीदुर्गांची माहिती दिली आहे. डॉ. गोडे यांनी या ग्रंथा बाबत तपशीलवार माहिती प्रसिध्द केली आहे. सुई सारख्या निमुळत्या आकाराचा, माणसाच्या आकाराचा, सुपाच्या आकाराचा, मध्ये तुटलेला, वाकडा तिकड़ा, नांगरा सारखा असे किल्ले राजाला राहण्यास योग्य नाहित असे नमूद केलेले आहे. याच ग्रंथात भद्र, अतिभाद्र, चंद्र, अर्ध-चंद्र, नाभ, सुनाभ, रुचिर, वर्धमान असे डोंगरी किल्ल्यांचे आठ उप प्रकार सांगितले आहेत. १) भद्र गिरिदुर्ग म्हणजे जो वर्तुळाकृती स्निग्ध आणि पर्वताच्या उंच पण सपाट पठारी शिखरावर आहे. तेथे पाणीही भरपूर आहे. अशा ठिकाणी राजा हत्तीवर बसून ध्वज पताका…

Review Overview

User Rating !

Summary : आज मितिस अशा सर्व प्रकारचे सर्व किल्ले अचुकपणे दाखविता येत नाहीत याची नोंद घ्यावी.

User Rating: 4.7 ( 3 votes)
0

One comment

  1. Dattatray Shinde

    छान माहिती, आणखी माहिती द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>