शूर शिलेदार येसाजी कंक

Yesaji Kank - येसाजी कंक चौऱ्याऐंशी मोसे खोऱ्यातील वतनदार बाजी पासलकर, राजे शिवाजी महाराज व दादोजी पंत कोंडदेवांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यासाठी रायरेश्वर मंदिराची निवड केली. श्रावणी सोमवारच्या शुभ दिनी पंतांनी दिलेल्या आमंत्रणानुसार कानद खोऱ्यातले झुंझारराव मरळ, मुठा खोऱ्यातले पायगुडे, रोहिड खोऱ्यातले कान्होजी जेधे आदी सुभेदार व राजांचे बालमित्र तानाजी मालुसरे, गणोजी दरेकर, विठोजी लाड आणि येसाजी कंकसहित अनेक मावळे रायरेश्वराच्या मंदिरात जमले आणि महादेवाच्या पिंडीसमोर बेलभंडारा हाती घेऊन स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली.

इ.स. १६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजय या मोहिमेसाठी गेले, त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी हैद्राबादच्या गोवळकोंड्याचा कुतुबशहा तानाशहाशी हातमिळवणी केली होती. भागानागरीत शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. कुतुबशहा तानाशह सोबत त्याचे सल्लागार मादण्णा व त्याचा भाऊ आकण्णा तर महाराजांसोबत सरनौबत हंबीरराव मोहिते, येसाजी कंक आणि प्रमुख सरदार सूर्याजी मालुसरे, आनंदराव मकाजी, मानाजी मोरे, सर्जेराव जेधे, बालाजी ढमढेरे, सोनाजी नाईक, दत्ताजी त्र्यंबक व प्रल्हाद पंत या सर्वांनी दादमहालात प्रवेश केला.

हारतुरे आणि सरबतपान देऊन तानाशहाने हसत हसत महाराजांना सवाल केला, “राजाजी, आपकी शाही फौज देखकर हमे बडी ख़ुशी हो गयी, लेकीन ताज्जूब कि बात याह ही कि आपके पास हाथी नाही देखा!”
“नही नही तानाशहाजी, हमारे पास पचास हजार हाथी है! म्हणजे असं की हमारा एक एक सिपाही हाथिके बराबर है! अगर आमच्या माणसाची ताकत तुम्हाला आजमावयाची असेल तर हमारे सामने खडे हुये आदमीयोंसे आप कोई भी आदमी चून सकते है की जो हाथी के साथ जंग करे|” महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं सवालाला जवाब दिला.

कुतुबशहा तानाशहाने महाराजांसमोर असलेल्या पहाडी मर्दांकडे नजर टाकून येसाजी कंकाकडे बोट दाखवीत विचारले, “क्या यह सिपाही हमारे हाथी से टकरायेगा?”
“क्यू नही?” महाराजांनी हसत हसत उत्तर दिले आणि येसाजींची हत्तीसोबत झुंजण्याचा दिवस ठरला. किल्ल्यामागील पटांगणात मादणणाने गोलाकार माळे रचून त्यावर नागरिकांना ही झुंज पाहण्यासाठी बिछायती अंथरल्या. महाराज आणि तानाशहासाठी एका खास माळ्यावर शामियाना उभारला.
झुंजेच्या दिवशी नागरिकांनी माळ्यावर गर्दी केली होती, शामियान्यात बसलेल्या महाराजांच्या चरणी येसाजींनी स्पर्श करून आशीर्वाद मागितला आणि नंग्या समशेरीनिशी पटांगणात उतरले. एवढ्यात साखळदंडानी बांधलेला तानाशहाचा मदांध हत्ती पंचवीस हबशांनी पटांगणात आणला व त्यांचे साखळदंड सोडून ते निमिषार्धात माळ्यावर जाऊन बसले.

हत्ती आणि माणसाची झुंज? कसं शक्य आहे? नागरिक आपआपसात चर्चा करीत होते; पण महाराजंच्या माणसांना हे शक्य होतं. आता कंबर कसून येसाजी पटांगणात उभे राहिले. हत्ती येसाजींना पाहून चवताळून चालून आला; तत्क्षणी येसाजींनी डाव्या अंगाला छलांग मारून हत्तीला हुलकावणी दिली.

नागरिक श्वास रोखून पाहात होते; तर तानाशाहाच्या कपाळी घाम फुटला होता. तो जवळ जवळ ओरडलाच “सुभान अल्ला! ये मै क्या देख राहा हुं?”. हुलकावणी दिल्यामुळे हत्ती सरळ पुढे गेला होता, तो माघारी वळला. फिरून पिसाळून त्याने येसाजींवर चाल केली ह्याही वेळी त्यांनी हत्तीला चकवले. सरळ लढण्याऐवजी ते हत्तीला लीलया खेळवत होते, खिजवत होते तसतसा हत्ती बेफाम होत चालला होता. आता येसाजींनीच हत्तीला धडक दिली, शाह थरथर कापू लागला, नागरिकांच्या अंगावर रोमांच उठले.

धडक दिल्यासारशी हत्तीने येसाजींना सोंडेत पकडले; परंतु मोठ्या शिताफीनं येसाजी सोंडेतून निसटले, सारी ताकत एकवटून त्यांनी हत्तीच्या सोंडेवर समशेरीचा घाव घातला. घाव इतका जबरदस्त होता कि जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा जो पळत सुटला तो परत आलाच नाही.

संदर्भ: शूर शिलेदार येसाजी कंक – इतिहास संशोधक कृष्णकांत नाईक

चौऱ्याऐंशी मोसे खोऱ्यातील वतनदार बाजी पासलकर, राजे शिवाजी महाराज व दादोजी पंत कोंडदेवांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यासाठी रायरेश्वर मंदिराची निवड केली. श्रावणी सोमवारच्या शुभ दिनी पंतांनी दिलेल्या आमंत्रणानुसार कानद खोऱ्यातले झुंझारराव मरळ, मुठा खोऱ्यातले पायगुडे, रोहिड खोऱ्यातले कान्होजी जेधे आदी सुभेदार व राजांचे बालमित्र तानाजी मालुसरे, गणोजी दरेकर, विठोजी लाड आणि येसाजी कंकसहित अनेक मावळे रायरेश्वराच्या मंदिरात जमले आणि महादेवाच्या पिंडीसमोर बेलभंडारा हाती घेऊन स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. इ.स. १६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजय या मोहिमेसाठी गेले, त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी हैद्राबादच्या गोवळकोंड्याचा कुतुबशहा तानाशहाशी हातमिळवणी केली होती. भागानागरीत शिवाजी महाराजांचे…

Review Overview

User Rating

User Rating: 3.89 ( 18 votes)
0

20 comments

 1. I am from Madhya Pradesh , Dewas . 14 the decendent of Yesaji Kank . We got jageri over here in Malva . And we are from Rajghar , Bhor . My grandfather was brought here by bhosle dynasty in 1942 . We have written proof here. If you want to see it , contact me .
  And yes Kank of Rajghar are also from our family only .

  • Hello Vivek Kank Sir,
   we are happy to hear that, request you to share the details. please mail to admin@shivray.com

   giving you some member contact details of rajghar family. hope you would like to contact them.
   Shashikant rambhau kank ( yesajinche 13 ve vanshaj) 9822119163.
   Siddharth sanjay lank (14 ve vanshaj) 8888270288.

 2. adarsh Halvankar

  mala whatsapp var maharajanchi mahiti patau shakata 9130304830…
  Jay Shivray

 3. खरच का दादोजी पंत कोड्देव नावाचा व्यक्ति होता ?
  काही पत्र किंवा दस्तावेज मिळेल का पाहायला कोनाकडे ?
  की फक्त ब्राह्मणी साहित्यानुसार आनल हे नाव ?

 4. santosh prakash kank

  namasakar,

  aapla itihas japun theva

 5. जी माहिती आपण पोस्ट करत आहात , त्या माहितीचा व्यवस्थित अभ्यास करत चला. शिवाजी महाराज हे पुर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. तरी त्यांच्या जीवनावर वाचनारे बरेच आहेत. त्या सर्वाना कधीही चूकीची माहीती मिळनार नाही ह्याची काळजी सर्व इतिहास संशोधकानी घ्यावी.

  सरसेनापती येसाजी कंक प्रतिष्ठाण, भुतोंडे.

  • अगदी खरे, सिद्धार्थ कंक यांच्याशी संपर्क करूनच उपडेट करण्यात आले आहे.

 6. Sir.mi sudha tumcyc vavnshamadhil aahe ani mala aapaky gharany vishae ashi baric mahiti ji mala kadhic mahit navati.
  Thanks ……you …so mutch.. Sidhart sir

 7. सिद्धार्थ कंक

  Tumhi je news vachi hoti tya news chya dusrya or tisrya diwshi aamhi punha sudharit mahiti update keli hoti sarv newspapers madhe. Yesaji kank yanche gaav he bhutonde asun tyanche vanshaj ajun hi bhutonde yethil tyanchya vadyamdhe rahtat. Tyach pramane Maharashtra til kontyahi itihas abhyasakas aapn yesajinchya gawa bddl v tyanchya vanshajanbddl vicharlat tr te tumhala bhutonde gaw ani aamche naav sangtil.
  Tarihi aapnas ajun kahi mahiti havi aslyas samparkbkarava. Purave v mahiti dili jaiel.
  Shashikant rambhau kank ( yesajinche 13 ve vanshaj) 9822119163.
  Siddharth sanjay lank (14 ve vanshaj) 8888270288.
  Dhannyawad.
  Krupaya satya mahiti lavkr update kara.

  • Can u plz tell me they really handled a sword of 65 kg …..if they are it’s really unbelievable….. AKSHAY GUJAR . from Nashik . (8657885122) plz reply me m excited

   • hello akshay,
    is not true; for battle one cannot use such heavy sword. around 40 kg sword (called as khanda) at jejuri is example you can imagine how heavy it is to lift and use. normal battle swords are ranging from 1.5 kg to 3-5 kg max. (depending upon metal, shape, thickness and length used)
    you can contact family members; mr Shashikant rambhau kank ( yesajinche 13 ve vanshaj) 9822119163 & Siddharth sanjay lank (14 ve vanshaj) 8888270288 for available swords of yesaji kank.

 8. सिद्धार्थ संजय कंक

  सरसेनापती येसाजी कंक यांचे गाव भुतोंडे असुन त्यांचे वंशज अजुनही भुतोंडे येथील त्यांच्या वाड्यात राहतात हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, हि अशी खोटी माहिती टाकुन लोकांपर्यंत खोटा इतिहास पसरविला जात आहे.
  सर्व पुरावे भुतोंडे येथे येसाजीच्या वाड्यासह उपलब्ध आहेत. इतिहास बदलन्याचा प्रयत्न कोनीही करु नये.

  • धन्यवाद सिद्धार्थ कंक,
   लेख संदर्भां खालील माहिती वृत्तपत्र महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेली आहे (०६ डिसेंबर २०१२) त्याची लिंक http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/-/articleshow/17498690.cms? तरीही आपणास यात चुकीचे वाटत असल्यास कळवावे, आम्ही माहिती मध्ये दुरुस्ती करू.

   • सिद्धार्थ संजय कंक

    वरील जे राजघर बद्दल तुम्ही पेपर ला वाचले होते त्याच्या दुसतभर्या तिसर्या दिवशीच्या पेपर मध्ये आम्ही त्याबद्दल सविस्तर सत्य माहिती दिली होती. येसाजी कंक यांचे मुळ गाव हे भुतोंडे आहे, त्यांचा वाडा भुतोंडे येथे अजुनही आम्ही योग्य रित्या जतन केलेला आहे व आम्ही तेथे राहत आहोत, येसाजींच्या तलवारी, पत्रे, नानी आमच्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला अजुन माहिती हवी असल्यास मला संपर्क करु शकता.
    सिद्धार्थ संजय कंक (सरसेनापती येसाजी कंक यांचे १४ वे वंशज) ८८८८२७०२८८

    • माहिती बद्दल धन्यवाद, तुम्हाला संपर्क करून साईट मधील माहितीत योग्य ते बदल करण्यात येतील.

  • तुम्ही जी माहिती update करताय त्या माहितीवर माझा पुर्ण पणे विश्वास आहे.. असेच मार्ग दर्शन करत करत रहा…

Leave a Reply to admin Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>