Home » शिवचरित्र (page 2)

शिवचरित्र

चरित्र ही एका व्यक्तीच्या संपूर्ण जीविताची वा त्यातील विशिष्ट कालखंडाची कहाणी असते. चरित्रलेखनात पहिली शर्त वस्तुनिष्ठेची. प्रत्यक्ष घडलेल्या घटना-प्रसंगांशी व प्रत्यंतर-पुराव्यांशी चरित्रकारास प्रामाणिक रहावे लागते. त्यामुळे चरित्र ही इतिहासाची शाखा मानली जाते.

छत्रपती राजाराम महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी, १६७० रोजी पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी १५ मार्च १६८० रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले होते. जानकीबाईंच्यानंतर राजाराममहाराज यांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ...

Read More »

राजमाता जिजाबाई आऊसाहेब

Mrinal Kulkarni as Rajmata Jijau

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता! कर्तृत्व मनगटात उतरण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं. मडक्याचा आकार कुंभाराच्या हातांवर आणि त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर, कल्पनाक्षमतेवर अवलंबून असतो. कर्तृत्ववान पुरुषांचही हेच सूत्र आहे. बालपणापासून ज्याला वाघ दिसला की झेप घेऊन त्याच्याशी त्याच्याच त्वेषानं लढावं ही ...

Read More »

शहाजीराजे मालोजीराजे भोसले

Shahaji Raje Bhosale - शहाजीराजे भोसले

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे व्यक्तिमत्त्व! जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा ...

Read More »

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म

छत्रपती संभाजी महाराज

मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला । शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला ।। वरील दोन ओळींतच खर्‍या अर्थाने संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो. संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा ...

Read More »

शिवरायांचे बालपण

शिवबा शिवाजी राजे

शिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झाला.. तीन चार महिन्यांनंतर शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकन विधीयुक्त केले. पुढे वर्ष दीडवर्ष हे कुटुंब शिवनेरीवरच एकत्रित होते. त्या नंतर १६३२ ते १६३६ ह्या दरम्यान शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला. संदर्भ – छत्रपती शिवाजी (सेतू माधवराव पगडी) त्यामूळे सन १६३२ ते १६३६ ...

Read More »

शिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने

Shivaji Maharaj

“शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून, त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण, स्पष्ट आणि तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते.” ...

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म

Shivneri fort Shivaji Maharaj Birth Place शिवरायांचे जन्मस्थान

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार सन १६२७ कि १६३० हे ठरवण्यात प्रामुख्याने २ प्रवाद दिसून येतात. एक जुनी पद्धत म्हणजे १६२७ सालचा शिवरायांचा जन्म मानणारी. सभासद बखर – जन्म तारखेची नोंद नाही. एक्याण्णव कलमी बखर – वैशाख मास शुद्ध ४ चंद्रावरी १५५९ (नेमके १५५९ आहे ...

Read More »

जयदेव जयदेव जय जय शिवराया

Shivkalyan Raja - Jay Shivray

जयदेव जयदेव जय जय शिवराया ! या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!! आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला आला आला सावध हो भूपाला सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?…..॥१॥ श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?…….॥२॥ त्रस्त अम्हि दीन अम्हि ...

Read More »