Home » शिवचरित्र » स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले

वेरूळच्या मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांनी पुत्र व्हावा म्हणून अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस केला होता.त्यामुळे पुत्र झाल्यावर शहाजी व शरीफजी अशी आपल्या पुत्रांची नावे त्यांनी ठेवली.शहाजीराजेंचा जन्म इ.स.१८ मार्च,१५९४ रोजी झाला.
शहाजीराजेंचे पिता मालोजीराजे भोसले निजामशाहच्या चाकरीत होते. निजामशाहच्या दरबारात सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव हे सुध्दा चाकरीत होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.पुढे निजामशाहच्या पुढाकाराने शहाजीराजेंचा विवाह,लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी जिजाबाई यांच्याशी इ.स.१६०३ मध्ये झाला. शहाजीराजें व जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये झाली. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजीराजेंचा सांभाळ जिजाबाईंनी केला.

शहाजीराजे मालोजीराजे भोसले

Shahaji Raje Bhosale - शहाजीराजे भोसले

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे व्यक्तिमत्त्व! जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा ...

Read More »