Home » शस्त्रास्त्रे

शस्त्रास्त्रे

प्राचीन काळातील युध्दात विविध शस्त्रांचा वापर झालेला आहे. कित्येक शस्त्रे अत्यंत घातक अशी होती.बहूतेक शस्त्रे ही वेगवेगळ्या धातूचा वापर करून बनविलेली होती. तर काहींचा वापर हा शत्रूच्या वारापासून संरक्षण करण्याकरिता होई.

वाघनख

Tiger Claws

वाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत लपवण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग ...

Read More »

कट्यार

कट्यार खंजीर

कट्यार हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात प्रचलित असलेले पात्याचे शस्त्र होय. हिला ‘एच’ या रोमन अक्षराच्या (रोमन: H) आकारातली मूठ असते; जेणेकरून शस्त्रधारकाच्या मूठ आवळलेल्या बोटांवरून हिचे पाते सरळ फुटल्यासारखे दिसते. हिच्या संरचनेमुळे लक्ष्याला भोसकण्यासाठी हिचा वार करता येतो. समारंभप्रसंगी गौरवचिन्ह म्हणूनही हिला महत्त्वाचे स्थान आहे. सध्याच्या काळात विवाह सोहळ्यात हिचा वापर केला जातो. उत्तर भारतात जसे मोजड्या पळवतात तसे महाराष्ट्रात ...

Read More »

दांडपट्टा किंवा पट्टा

दांडपट्टा - Dandpatta

दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. तलवारबाजीतील कौशल्याचा सुंदर आविष्कार म्हणजे दांडपट्टा. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले ...

Read More »

मराठी भाले

Maratha Javelin - भाले

भाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे. याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल (भाल्याचे पाते) या संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला. भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते. भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप होय. हलके व आखूड भाले शत्रूवर फेकता येतात. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता भाल्याचा उपयोग ...

Read More »

तलवार

Maratha Sword Patterns - मराठा तलवारींचे प्रकार

तलवारीचे प्रकार – कर्नाटकी धोप, खंडा (मराठा), राजस्थानी (राजपुती), समशेर (मोगली), गुर्ज, पट्टा, आरमार तलवार, मानकरी तलवार तलवारीच्या मुठीवरूनच सुमारे तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार होतात. मुठी ह्या प्रमुख्याने तांबे, पोलाद, पितळ, हस्तिदंत इत्यादींच्या असतात, तसेच किरच, तेग, सिरोही, गद्दारा, कत्ती इ. उपप्रकार होत. खंडा, मुल्हेरी, फटका हे मराठा तलवारींचे काही प्रकार . तलवारीचे नखा, खजाना, ठोला, परज, गांज्या, अग्र असे ...

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र

Shivaji Maharaj British Musuem

शिवकाळात शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते. अफझलखाना विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत, बिचवा यांचा प्रभावी वापर असेल, पावनखिंडीत बाजीप्रभू आणि रायाजी बांदल यांनी पट्टा वापरून केलेली शर्थ असेल किंवा शंभूकाळात चीक्कदेव याच्याविरुद्ध केलेला धनुष्य-बाणाचा वापर असेल. शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे. अश्याच काही शस्त्रांची छोटीशी ओळख करून देण्याचा इथे प्रयत्न ...

Read More »