छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय दरम्यान सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्यावर बिजापुरच्या पश्चिमेकडिल पठाणंची फळी गारद करण्याची जबाबदारी महाराजांनी सोपविली होती. येलबुर्ग्याला हंबीरावांनवर पठाणाची प्रचंड फौज चालून आली. अब्दुलरहीमखान मियान स्वतः आघाडीच्या हत्तीवर बसून या फौजेचे नेतृत्त्व करीत होता.
पण या पठानांच्या सेना सागराला पाहून मराठे किंचित सुद्धा घाबरले नाहीत, उलट युद्ध गर्जना करीत ते शत्रुवर तुटून पडले. मराठ्यांचा आवेश असा काही होता की पठाणांच्या देहाचे लचके तोडीत ते पुढे सरकू लागले. हा आवेश पाहून पठाण आवाक झाले आणि ते जीव मुठीत धरून पळू लागले. खानाने सुद्धा आपला हत्ती रणांगणातून बाहेर काडला. खान पळतो आहे हे पाहताच नागोजी जेधेंनी (कान्होजी जेधे यांचा नातू) आपला घोडा त्याच्या हत्ती समोर आडवा घातला आणि आपला भाला खानाच्या दिशेने फेकला. पण खान त्यातून बचावला आणि लगेच त्याने बाण नागोजीच्या दिशेने सोडला. तो बाण नागोजी जेधेंच्या डोक्यात घुसला आणि ते रणांगणात कोसळले पण तोपर्यंत धनाजी जाधव यांनी खानाला वेढले होते.
खान कैद झाला, पठाणांची पार वाताहात झाली, त्यांचे अनेक घोड़े, हत्ती, आणि द्रव्य मराठ्यांचा हाती लागले. पण नागोजी जेधे हे या युद्धात कामी आले होते सर्जेराव जेधे यांना पुत्रशोक झाला पण त्यांनी माघार घेतली नाही आणि पुढच्या मोहिमेसाठी ते हंबीरावांबरोबर निघून गेले. ही वार्ता कारी गावात समजताच नागोजींच्या पत्नी सती गेल्या.
संदर्भ: जेधे शकावली, सभासद बखर
Review Overview
User Rating !
Summary : खान पळतो आहे हे पाहताच नागोजी जेधेंनी आपला घोडा हत्ती समोर आडवा घातला आणि आपला भाला खानाच्या दिशेने फेकला. पण खान त्यातून बचावला आणि लगेच त्याने बाण नागोजीच्या दिशेने सोडला. तो बाण नागोजी जेधेंच्या डोक्यात घुसला आणि ते रणांगणात कोसळले पण तोपर्यंत धनाजी जाधव यांनी खानाला वेढले होते.
नागोजी जेधेंच्या वीरपत्नीचं नाव गोदूबाई जेधे. त्या साधारण तेरा वर्षांच्या असताना ‘कारी’ ह्या गावी सती गेल्या.