छत्रपती शिवरायांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेली एकमेव आरती

जय देव जय देव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया
आर्यांच्या देशावरि म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला ।
सद्गदिता भूमाता दे तुज हांकेला
करुणारव भेदुनी तव हृदय न कां गेला
जय देव जय देव जय जय शिवराया
श्रीजगदंबाजीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळतां
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?
जय देव जय देव जय जय शिवराया
त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या
जय देव जय देव जय जय शिवराया |
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
शिवरायांचे मूळ छायाचित्र: राहुल बुलबुले
Review Overview
Summary : छत्रपती शिवरायांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेली एकमेव आरती
नमस्कार
कृपया यशवंत दिनकर पेंढारकर यांनी लिहिलेले शिवरायांवरील छत्रपती शिवराय हे खंडकाव्य कुठे उपलब्ध हाेईल हे कळवावे.
विकत घेण्यसाठी बरीच शाेधाशाेध केली पण मिळाले नाही.
online व offline हि शाेधले.
pdf मध्ये असेल तरी चालेल किंवा त्याची प्रत मिळाली तर उत्तम.
कळवावे
पुण्यातील रसिक साहित्य किंवा बुकगंगा च्या ऑफिसमध्ये चौकशी करू शकता, उपलब्ध नसल्यास पर्यायी मार्ग सांगतील. धन्यवाद.