Shivneri fort Shivaji Maharaj Birth Place शिवरायांचे जन्मस्थान
Shivneri fort Shivaji Maharaj Birth Place शिवरायांचे जन्मस्थान

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला.

वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार सन १६२७ कि १६३० हे ठरवण्यात प्रामुख्याने २ प्रवाद दिसून येतात.

एक जुनी पद्धत म्हणजे १६२७ सालचा शिवरायांचा जन्म मानणारी.
सभासद बखर – जन्म तारखेची नोंद नाही.
एक्याण्णव कलमी बखर – वैशाख मास शुद्ध ४ चंद्रावरी १५५९ (नेमके १५५९ आहे कि १५४९ / १५५१ असे आहे ह्या बाबत सांशकता आहे) क्षयणाम संवत्सरी
चिटणीस बखर – शके १५४९ प्रभाव नाम संवास्तरे वैशाख शुद्ध २ गुरुवार
मराठी साम्राज्याच्या छोटी बखर – १५४९ क्षयनाम संवास्तरे माहे वैशाख शुद्ध ५ चंद्रवासरी
शिवदिग्विजय – शके १५४९ प्रभाव संवत्सर वैशाख शुद्ध २ गुरुवासरे
शिवाजी प्रताप – तीस शके १५४९ रक्ताक्षी नाम संवास्तरे
शेडगावकर भोसले बखर – शके १५४९ प्रभावनाम संवत्सरे फसली सन १०३७ मिती वैशाख शुद्ध ३ रोजी शनवार
पंतप्रतिनिधी बखरीत – शके १५४९ शके प्रभाव नाम संवत्सर वैशाख शुद्ध १५ इंदुवारी
न्यायशास्त्री पंडितराव बखर – शालिवाहन शके १५४९ प्रभावनामे संवत्सरे

दुसरा प्रवाद – १६३० सालच्या जन्माचा आहे.
जेधे शकावली – शके १५५१ शुक्ल संवत्सर, फाल्गुन वद्या त्रितीय शुक्रवार (१९ फेब्रुवारी १६३०) नक्षत्र हस्त घाटी १८ पळे ३१ गड ५ पळे ये दिवसी
शिवापुरकर देशपांडे वहीतील शकावली – शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी फाल्गुन वद्या ३ शुक्रवार
forbes collection – जेधे शकावली सारखेच..
कवींद्र परामानंदांच्या अनुपुरण – शालिवाहन शके १५५१ शुक्लानाम सवत्सरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्या तृतीयेला रात्री..
शिवराम ज्योतिषी यांनी केलेली शिवाजी महाराजांच्या कुंडली नुसार – संवत १६८६ (शके १५५१) फाल्गुन वद्या ३ शुक्र उ. घाटी ३०/९ राजा शिवाजी जन्म : र. १०/२३ ल. ४/२९.

अश्याप्रकारे वेगवेगळी मत मतांतरे आहेत. एकंदर सर्वांचा अभ्यास करतांना इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे यांच्या मतानुसार निव्वळ जन्म तिथी बाबत काय उल्लेख आलेला आहे हे ग्राह्य न पकडता त्या संदर्भात इतर उल्लेखही तपासून त्यांची ग्राह्यता किंवा आग्रह्यता तपासावी.

इ.स. १६२७ सालचा जन्म बऱ्याच ठिकाणी देण्यात आलेला आहे. मूळ चिटणीस बखरीतील जे वर्णन आलेले आहे त्या नंतरच्या बखरकारांनी कमी जास्त प्रमाणात तेच वर्णन उचलून धरलेले आढळते.
पण १६२७ सालचा जन्म गृहीत धरल्यास. तो शिवनेरी किल्ल्यावर झाला असेल का असा प्रश्न उभा ठाकतो. कारण, सर्वच बखरीत जिजामाता ६-७ महिन्यांच्या गरोदर असतांना त्या जाधवरावांच्या काही हालचालींमुळे शिवनेरीस येऊन राहिल्या असे लिहितात.
जाधवराव (जिजामातांचे वडील) इ.स. १६२१ मध्ये निजामशाही सोडून मोघलांकडे गेले. दरम्यान सन १६२३ला ते शहाजहानच्या बंडात सामील होऊन मलिक अंबरकडे काही दिवस खुर्रमचा हस्तक म्हणून होते. पण तिथे खंडागळेचे प्रकरण उद्भवले त्यात जाधवरावांचा मोठा मुलगा मारला गेला व शहाजीराजेंचा सर्वात वडील चुलत भाऊ संभाजीही मारला गेला. तेव्हा शहाजीराजे चुलत भावाच्या मदतीस गेले असता जखमी झाले. ह्या प्रकरणा मूळे जाधावारावांना परत खुर्रमच्या गोठ्यात परतावे लागले. त्यानंतर ते १६२९ला परत आले. या दरम्यान भातवाडीच्या लढ्यात (इ.स. १६२४-१६२५) शहाजी महाराज आणि जाधवरावांचा आमना सामना झाला असावा अशीही शक्यता राहत नाही कारण जाधवराव त्या वेळेस युद्धात सामील न होता आपल्या जहागिरीत जाऊन बसले होते. खुर्रम उत्तर हिंदुस्थानात जाताच जाधवराव परत मोगली चाकरीत शिरले.
आत्ता शहाजीराज्यांबद्द्ल माहिती घेऊयात, इ.स. १६२३ च्या खंडागळे प्रकरणामूळे जाधव आणि भोसले घराण्यात वितुष्ट आली होती. हे मागे बघितले. पुढे शहाजी राजे भातवाडीच्या लढाई (१६२४-२५) नंतर भाऊ बंधकीमूळे निजामशाही सोडून इ.स. १६२५ अखेर आदिलाशाहाची “सरलश्करी” पत्करली. हि सरलश्करी शहाजी राजांनी १६२८ च्या पावसाळ्या पर्यंत केली ह्यास कागद पत्रांची पुष्टी मिळते. अर्थात अश्या काळात आदिलशहाकडे असताना १६२७ लाच जिजाऊना शिवनेरी (निजामशाहीत ) गडावर ठेवणे अशक्य आहे.
पुढे बखरींच्याच वर्णना नुसार. जिजाऊ व ३-४ वर्षाचा मुलगा संभाजी शहाजी महाराजांबरोबर विजापुरी गेल्याचे आढळते. मग १६२७ चाच जन्म गृहीत धरायचा झाल्यास तो विजापूरचा अथवा कर्नाटकातील धरायला लागतो.
परंतु जिजाउंना संभाजी राज्यांनंतर ४ मूले अल्पजीवी निपजली. यातील निदान २ तरी १६२५ – १६२८ च्या विजापुरी मुक्कामातील असली पाहिजेत या वरून जिजाऊ शहाजी महाराजांसोबतच विजापूरला गेल्या हे सिद्ध होते व शिवाजी राजांचा जन्म १६२८च्या पावसाळ्या नंतरच ग्राह्य पकडावा लागतो.
तसेच निजामशाही बुडत आहे हे बघून शहाजी राज्यांनी अनेक मराठा सरदारांना एकत्रित करून बंडाळी उठवली, ती १६२९ ला. म्हणजे १६२८ ला आदिलशाही सोडून ते निजामशाही कडे आले वा १६२९ ला बंड उठवले त्यात जाधवरावही सहभागी होते. अर्थात १६२३ च्या खंडागळे प्रकारानंतर जाधवराव – शहाजी जिजाऊ यांचा जो काही संबंध आला असावा तो १६२९ या सालीच. नंतर ऑगस्ट मध्ये १६२९ लाच जाधवरावांना मारण्यात आले. म्हणजे त्या नंतर संबंध येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वा त्या आधी त्यांच्या भेटीची शक्यताच न्हवती म्हणून तो संबंध १६२९ या सालचाच असावा. पुढे जाधावरावांना धोक्याने मारल्या मूळे शहाजी राजांनी निजामशाही सोडण्याचे ठरवले वा त्यांनी आपल्या जहागिरीत जाऊन मोघालांशी संधान साधले. ह्या दरम्यानच शिवनेरी वरील निजामी चाकरीत असलेला वैभवशाली विजयराज ह्याच्या मुलीशी (जयंती ) आपला मुलगा संभाजी ह्याचे विवाह लावून दिले. तो काळ १६२९ नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा आणि लग्न लावून दिल्यावर शहाजी राजे दुसऱ्या पंधरवड्यात मोगलांची पंचहजारी सरंजाम वा संभाजीला हजारी घेतली. संभाजीच्या लग्नाच्या वेळेस जिजाऊ ६-७ महिन्याची गरोदर असावी असा तर्क निघतो व त्यामूळे आपल्या समध्याकडे जिजाऊना संरक्षणास ठेवले हा तर्क जास्त संयुक्तिक आहे.
त्यामुळे जाधवराव पाठीमागे लागले म्हणून न्हवे तर जाधवरावांचा खून झाल्यामुळे निजामी मंत्र्याच्या सुडार्थ शहाजी महाराजांनी मोघलांना जाऊन मिळायचे ठरवले तेव्हा संभाजीचे लग्न लाऊन जिजाऊना शिवनेरी ठेवले.
जिजाऊनच्या भावाचा मेव्हणा आणि मुलगा संभाजी ह्याचा सासरा विजयराजा असा दुहेरी संबंध जोडला गेल्याने जिजाऊनच्या संरक्षणाची संपूर्ण खात्री पटल्यावर शहाजी महाराज मोघलांना जाऊन मिळाले.
अश्या प्रकारे १६३० साली शिवनेरी वरच शिवरायांचा जन्म झाला असा निष्कर्ष काढता येतो.

आत्ता पुढून मागे तपासणी करायची झाल्यास..
बखरींच्या वर्णनानुसार निजामशाही बुडाल्यावर शहाजीराजे आदिलशहाकडे बारा हजारी ‘फर्जंद’ वजीर म्हणून गेले व आपल्या मुलाला व पत्नीला त्यांनी बोलावले त्यावेळी शिवाजीराजे ७ वर्षाचे होऊन गेले होते आदिलशहा सोबत हा करार शहाजी महाराजांनी १६३६ च्या उत्तरार्धात केला त्यावरून ७ वर्षे आधी म्हणजे १६२९ – १६३० चा पूर्वार्ध ह्या दरम्यान शिवाजी राजांचा जन्म असावा असा तर्क निघतो.
पुढे परत इ.स. १६४२ ला आदिलशाहीत आपलं धर सुटत आहे हे बघून शहाजी राजांनी शिवाजी व जिजाईला १६४२ साली पावसाळ्यानंतर पुण्यात रवाना केले. त्या वेळेस शिवाजीराजांचे वय वर्षे १२ होते. परत एकदा ह्यानुसार १६३० चाच तर्क निघतो.
बखरीन नुसार दादाजी कोंडदेव वारले तेव्हा शिवाजी महाराज १७ वर्षाचे होते. दादोजींचा मृत्यू काल १६४७ मार्च नंतर जुलै पूर्वीचा दिलेला आहे. ह्या वरून परत एकदा जन्म साल १६३० बरोबर ठरते.
अश्या अनेक गोष्टींची पडताळणी करून वा.सी. बेन्द्रेंनी शिवजन्म तारीख १९ फेब्रुवारी १६३० अशी ठरवलेली आहे.

संदर्भ ग्रंथ – श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
लेखक – वा.सी. बेंद्रे. १९७२ प्रकरण दुसरे – शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण..पान क्रमांक १७-३७

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार सन १६२७ कि १६३० हे ठरवण्यात प्रामुख्याने २ प्रवाद दिसून येतात. एक जुनी पद्धत म्हणजे १६२७ सालचा शिवरायांचा जन्म मानणारी. सभासद बखर - जन्म तारखेची नोंद नाही. एक्याण्णव कलमी बखर - वैशाख मास शुद्ध ४ चंद्रावरी १५५९ (नेमके १५५९ आहे कि १५४९ / १५५१ असे आहे ह्या बाबत सांशकता आहे) क्षयणाम संवत्सरी चिटणीस बखर - शके १५४९ प्रभाव नाम संवास्तरे वैशाख शुद्ध २ गुरुवार मराठी साम्राज्याच्या छोटी बखर - १५४९ क्षयनाम संवास्तरे माहे वैशाख शुद्ध ५ चंद्रवासरी शिवदिग्विजय - शके…

Review Overview

User Rating

Summary : छत्रपती शिवराय म्हणजे मराठी माणसाचे, हिंदुस्तानचे अखंड स्फूर्तीस्थान.स्वदेश आणि स्वधर्म यांच्या संरक्षणार्थ आर्थिक व राजकीय दृष्ट्या सबळ अश्या स्वराज्याचे निर्माते....सार्वभौम राजा,रयतेच्या प्रतिष्ठेचे उदगाते,नूतन सृष्टीचे निर्माते छत्रपती शिवराय म्हणजे एक महान युगपुरुष.. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत जाणता राजा.. बहुतजनांसी आधारू असा श्रीमान योगी राजा.

User Rating: 3.15 ( 54 votes)

11 comments

  1. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य पुन्हा यावे अशी सर्व सामान्य जनतेची ईच्छा आहे

  2. Chhatrapati Shivaji Maharaj ki jai

  3. द.मा.माने

    जय जिजाऊ…
    अतिशय महत्त्वाची माहिती. छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला…
    धन्यवाद…

  4. Nimish Vishwasrao

    Namaskar, Majhe naav Nimish Vishwasrao aahe, mi Mumbai la rahto. Tumhi mala Shivjanm chya veli Shivneri che Killedar Vijayrao Vishwasrao hyanchya baddal kahi mahiti sangu shakta ka? Tey Shivneri var yenya aadhi kuthe hote va nantar tey kuthe gele v tyanchya kulabaddal kahi mahiti aahe ka?

    Dhanywad

  5. Prabhat Mahadik

    chhan mahiti aahe

  6. vedant bhosale

    nice info and references

  7. DATTATRA HONAJI DUBHASHE

    khup aanda jhala ho website pahun…

  8. Kiran Jadhav

    thanks. mast zaliy website.

  9. Great work guys! Really happy and proud to see website on Chatrapati Shivaji Maharaj and his empire.
    Thanks again for providing valuable information.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

रायगड

किल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. ...

शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक १३ राजमुद्रा

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३ प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त ...

शिवराय प्रश्न मंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक १२

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२ इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील ...

प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक ११, Quiz Contest 2015 , Question Number 11

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११ श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ ...

शिवबा शिवाजी राजे

शिवरायांचे बालपण

शिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झाला.. तीन चार महिन्यांनंतर शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकन विधीयुक्त केले. ...