Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray https://shivray.com छत्रपती शिवाजी महाराज Shivba Shivajiraje Shivprabhu Chatrapati Shivaji Maharaj Sun, 23 Aug 2020 12:35:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.5.1 युगप्रवर्तक छत्रपती शिवराय https://shivray.com/%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-shivray/ https://shivray.com/%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-shivray/#comments Fri, 20 Mar 2020 06:49:16 +0000 https://shivray.com/?p=1809 ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पिक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व जिजामाता यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी, १६३० रोजी, (संदर्भ: श्री राजा शिवछत्रपती, गजानन मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन्स) पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. वडिलांचा जाहगिरीचा प्रदेश बंगळूरचा (कर्नाटक) असल्यामुळे शिवबांची जडण-घडण त्यांच्या आई जिजाबाईंच्या सहवासात व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली. रामायण, महाभारत या गोष्टींचे शिवबांवर लहानपणापासून संस्कार झाले. या गोष्टींच्याच माध्यमातून त्यांची स्वराज्य प्रेरणा जिजाबाईंनी जागृत केली. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी लहानपणीपासून मोठ्या कुशलतेने केला. त्याचबरोबर लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी याबाबतीतही शिवबा पारंगत झाले.

शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असलेल्या अस्सल पत्रांमधून त्यांच्याविषयी असलेल्या संदर्भ साहित्यातून, महाराजांचे भव्यदिव्य व्यक्तिमत्व सकारात जाते. शिवराय कोणासारखे होते? त्यांच्यापुढे कोणाचे आदर्श होते

संदर्भ:
श्री राजा शिवछत्रपती, गजानन मेहेंदळे (डायमंड पब्लिकेशन्स)
राजा शिवछत्रपती, बाबासाहेब पुरंदरे (पुरंदरे प्रकाशन)

]]>
https://shivray.com/%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-shivray/feed/ 2
अफझल खान वध https://shivray.com/%e0%a4%85%e0%a4%ab%e0%a4%9d%e0%a4%b2-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%a7/ https://shivray.com/%e0%a4%85%e0%a4%ab%e0%a4%9d%e0%a4%b2-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%a7/#respond Mon, 23 Dec 2019 13:34:05 +0000 https://shivray.com/?p=2011 सभासदाने खानवधाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असावा एवढ्या बारकाईने तो या प्रसंगाचे चित्रण करतो. एवढेच नाही तर हे सर्व चित्रण कमालीचे प्रत्ययकारी झाले आहे.

राजे भेटीस निघाले

दुसरे दिवशी गडाखाली राजियानी सदर केली. डेरे, बिछाने व असमानगीर्या, तवाशिया व मोतियाच्या झालरी लाविल्या. चित्रविचित्र बडे व लोडे, गाद्या पदगाद्या टाकिल्या. सदर सिद्ध केली.

घाटमाथा लष्करसुध्धा नेताजी पालकर आणविले होते. त्यासी इशारत सांगोन पाठविले कि, ‘ उद्या खानाचे भेटीस जातो, फत्ते करितो आणि गडावरी येतो तेंव्हा एकच आवाज गडावरी करितो. तेंव्हा तुम्ही घाटाखाली उतरोन लष्करात खानच्या चालोन येऊन मारामारी करणे.’

तैसेच कोकणातून राजश्री मोरोपंत पेशवे आणविले. त्यासही गडावरील आवाजाची इशारत सांगितली. आपण निवडक लोक गडावरून उतरोन जागा जागा झाडीत ठेविले. आणि खास राजीयानी स्नान करून भोजन केले. जरीची कुडती घातली. डोईस मंदिल बांधिला. पायात चोळना घालून कास कसली व हातात एक बिचवा व वाघनख चढविले आणि बराबर जिऊ महाला म्हणून मरदाना होता, त्याजवळ एक पट्टा व एक फिरंग व ढाल. तैसाच संभाजी कावजी महालदाराजवळ पट्टा व फिरंग व ढाल ऐसे दोघे माणसे मर्दानी आपणाबरोबरी भेटीस घेतली. वरकड आसपास धारकरी लोक जागा जागा जाळीत उभे केले. आणि राजियाने सिद्ध होऊन गडाखाली भेटीस जावयास उतरले.

उतावीळ खान

गोटातून भेटीस यावयास खानही सिद्ध होऊन चालले. बराबरी लष्कर हजार दीड हजार, बंदुकी मुस्ते होऊन चालिले. मोठे मोठे धारकरी लोक समागमे निघाले. इतक्यात पंताजी पंत पुढे होऊन अर्ज केला कि, ‘ इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धाशत खाईल. माघार गडावरी जाईल. भेटी होणार नाही. शिवाजी म्हणजे काय ! यास इतका सामान काय करावा, राजा दोघा माणसानिशी तिकडोन येईल. तुम्ही इकडोन दोघानिशी चालावे. दोघे बैसोन भेटावे. तेथे तजवीज करणे ते करा !’

असे सांगितल्यावरी अवघा जमाव दूर, बाणाचे टपियावरी उभे राहून खासा खान एक पालखी दोघे हुद्देकरी व कृष्णाजी – पंत हेजीब असे पुढे चालिले, सैदबंडा पटाईत, एक लष्करी समागमे घेतला. पंताजीपंतही बराबरी आहेत, असे सदरेत गेले.

सदर देखोन खान मनात जळाला कि, ‘ शिवाजी म्हणजे काय? शाहाजीचा लेक. वजीर यास असा जरी बिछाना नाही ! अशी मोतीलग सदर म्हणजे काय? पादशहास असा सामान नाही, येणे जातीचा त्याने सामान मेळविला ! ‘

असे बोलताच पंताजीपंत बोलिला जे, ‘ पातशाई माल पाद्शाहाचे घरी जाईल, त्याची इतकी तजवीज काय? ‘ असे बोलून सदरेस बैसले. राजियास सिताब आणवणे म्हणून जासूद, हरकारे रवाना केले.

अफझलखानाचा वध

राजे गडाचे पायी उभे होते. तेथून हळूहळू चालिले. समाचार घेता खानाबरोबर सैदबंडा मोठा धारकरी आहे हे ऐकून उभे राहिले. आणि पंताजी पंतास बोलावू पाठविले. ते आले. त्यास म्हणू लागले जे, ‘ जैसे महाराज तैसे खान. आपण खानाचा भतीजा होय. ते वडील. सैदबंडा खानाजवळ आहे. त्या करिता शंका वाटते. हा सैदबंडा इतका यातून दूर पाठवणे, ‘ म्हणोन पंताजी पंतास सांगितले.

त्यावरून पंताजी पंत याणी जाऊन कृष्णाजी पंताकडून खानास सांगोन सैदबंडाहि दूर पाठविला. खान व दोघे हुद्देकरी राहिले. तेंव्हा राजेही हिकडून जिऊ महाला व संभाजी कावजी दोघे हुद्देकरी यासहित गेले.

खानही उभा राहून पुढे सामोरा येऊन राजियास भेटला. राजियाने भेटी देता खानाने राजियाची मुंडी कवटाळून खाकेखाली धरिली. आणि हातीची जमदाड होती, तिचे मेणे टाकून कुशीत राजियाचे चालविली. तो अंगात जरीची कुडती होती. त्यावरी खरखरली. अंगास लागली नाही.

हे देखोन राजियानी डावे हाताचे वाघनख होते तो हात पोटात चालविला. खानाने अंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करिताच खानची चरबी बाहेर आली ! दुसरा हात उजवे हातचे बिचवियाचा मारा चालविला. ऐसे दोन वार करून मुंडी आसडून चौथरियाखाली उडी घालोन निघोन गेले !

खानाने गलबला केला कि, ‘ मारिले ! मारिले ! दगा दिधला ! बेगी धावा ! ‘ असे बोलताच भोयांनी पालखी आणिली आणि पालखीत घालून उचलून चालविला. इतकियात संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारिले. आणि पालखी खळे भोयास पाडिले. खानाचे डोचके कापिले ; हाती घेऊन राजियाजवळ आला.

इतकियात सैदबंडा पटाईत धावला. त्याने राजे जवळ केले. पट्ट्याचे वार राजियावारी चालविले. तो राजियाने जिऊ महालियाजवळ आपला हुद्दियाचा पट्टा घेऊन, पट्टा व बिचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार औढिले ! पाचवे हाताने राजियास सैदबंडा मारावा, तो इतकियात जिऊ महाला याणे फिरंगेने खांद्यावरी सैदबंडियासी वार केला. तो पट्टीयाचा हात हत्यारासमेत तोडिला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.

घोरांदर युद्ध जाहले!

गडावरी जाताच एका भांड्याचा आवाज केला. तोच गडाखालील लोक व घाटावरील लोक व लष्कर व कोकणातून मोरोपंत व मावळे असे चौतर्फी चोहोकडून चालोन खानाचे गोटावारी आले आणि ‘ खान मारून शीर कापून राजे गडावरी गेले ‘ हि खबर कळोन कुल खानाचे बारा हजार लष्कर धास्त घेऊन अवसान खस्त जाहाले. इतकियात राजियाच्या फौजा चौतर्फा मारीत चालले. मोठे घोरांदर युद्ध जाहाले. दोन प्रहर घोरांदर युद्ध जाहले.

खानाकडील मोठमोठे वजीर व लष्करी महदीन व उजदीन पठाण, रोहिले, सुन्नी (?) व आरबी वगैरे मुसलमान आणि जातिवंत मराठे, धनगर व ब्राम्हण ; तसेच तोफांचे बैली व कर्नाटकी प्यादे बदुखी, आड हत्यारी, सांगा बरचीवाले व दुरादीवाले, कुराडीवाले (=रोचेवार व हिलगेवर) व बाजे जातचे, इटेकरी हतुलवे (?) तिरंदाज व छडीवाले व पटाईत खाकाईत व तोफखाना ऐसे एकंदर जमनिदान करून भांडण दिधले. मोठे क्षेत्र जाहले. राजियाचे लष्करी लोकांनी व मावळे लोकांनी पाय उतार होऊन मारामारी केल्या. हत्ती तोडिले, ते जागा ठार झाले. कित्येक हत्तीची पुच्छे तोडिली. कित्येक हत्तीचे दात तोडिले. कित्येक हत्तीचे पाय तोडिले. तसेच घोडे एकच वराने जीवे मारिले. तसेच खानाचे लष्करी कित्येक ठार मारिले. कित्येकाचे पाय तोडून पाडिले. कित्येकांचे दात उडविले. कित्येकांची डोचकी फोडिली. कित्येक मेले. युद्धास आले ते मारून पडून भुईस रगडिले. तसेच उंटे मारिली. मारित असता रण अपार पडले. संख्या न करवे ! रक्ताच्या नद्या चालल्या. रणकंदन जाले. ऐसे मारामारी करून हत्ती, घोडे, उंट व मालमत्ता व पालख्या वजीर पाडाव करून आणिले. –

बीतपशील

६५ हत्ती व हत्तिणी सुमार ४००० घोडे सुमार

३,००,००० जडजवाहीर १,२०० उंटे सुमार

२,००० कापड वोझी ७,००,००० नगद व मोहोरा व होन सोने रुपये.

भांडी तोफखाना सर्वही घेतले. कलम १. वजीर पाडाव जाहले : बीतपशील –

१ सरदार व वजीर मातबर. १ मंबाजी भोसले, १ अफझलखानाचे पुत्र १ नाटकशाळेचे पुत्र, १ राजेश्री झुंजारराव घाडगे, १ या खेरीज लोक कलम १ येणे प्रमाणे पाडाव केले. या खेरीजही जिन्नस मालमत्ता, गुरेढोरे, बैल, मबलग मत्त पाडाव केले. भांडते लोकांनी तोंडी तृण धरून शरण आले त्यासी व बायकामुले, भट-ब्राह्मण, गोरगरीब असे अनाथ करून सोडिले. राजा पुण्यश्लोक शरणागतास मारीत नाही. याजकरिता त्याचे लोकांनीही कित्येक अनात सोडिले. अफझलखानाचा लेक फजल हा पायी चिरगुटे बांधून झाडीत पळोन गेला. तसेच कित्येक भले लोक पळोन गेले. संख्या न करवे.

जखमी सैनिकांची विचारपूस

ऐशी फत्ते करून जय जाहला. मग राजे याणी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते, त्यास धरून आणिले. राजा खास प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफझलखानाचे लोक व त्याचे पुत्र, भांडते माणूस होते, तितकियास भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते, त्यांच्या लोकास चालविले. पुत्र नाही त्यांच्या बाय्कास निमे वेतन करून चालवावे असे केले. जखमी जाहले त्यास दोनशे होन व शंभर होन, दर आसामीस जखम पाहून दिधले. मोठे मोठे लोक धारकरी जुमले होते, त्यास बक्षीस हत्ती, घोडे दिधले. हस्तकडी, कंठमळा, तुरे, पदके, चौकडे, मोत्यांचे तुरे, कित्येकास बक्षीस फार दिले. ऐसे देणे लोकास दिधले. कित्येकास गावमोकासे बक्षिस दिधले. लोक नावाजिले. दिलासा केला.

विजयोत्सव

मागे कौरवाचा क्षय पांडवांनी केला. असा वीरावीरास झगडा जाहाला. खासा खान राजियाने एकांगी करून मारिला. अफझलखान सामान्य नव्हे. केवळ दुर्योधनच जातीने होता. आंगाचा, बळाचाही तैसाच ! आणि दुष्ट बुद्धीने तैसाच ! त्यास एकले भीमाने मारिला, त्याचप्रमाणे केले. शिवाजी राजाही भीमच ! त्यांनीच अफझल मारिला. हे कर्म मनुष्याचे नव्हे. अवतारीच होता. तरीच हे कर्म केले. यश आले, असे जाहाले. खानाकडील वजीर पाडाव केले होते त्यास वस्त्रे, भूषणे, अश्व देऊन अनाथ करून सोडिले. त्या उपरी राजश्री पंताजीपंतासही उदंड वस्त्रे, अश्व, अलंकार दिधले. अपर द्रव्यही दिधले. खुशाली केली.

राजगडास मातुश्रीस व सर्वासही फत्तेची खबर लिहून पाठविली. त्यानीही वर्तमान ऐकून साखरा वाटून नगरे – करणे केले. भांडी मारिली. मोठी खुशाली केली. येणे रीतीने राजियाकडील वर्तमान जाहाले.

विजापुरी एकच आकांत!

त्या उपरि विजापुरास चवथे दिवशी जासूद – हरकारे यांनी खबर पाद्शाहास व पाद्शाहाजादीस जाहीर केली कि, ‘ अफझलखान खासा मारून शिर कापून नेले. कुल लष्कर लुटून फस्त केले, ‘ असे सांगताच अली अदलशाहातक्तावरोन उतरोन महालात जाऊन पलंगावरी निजला. त्याणे बहुत खेद केला. असेच पाद्शाहाजादीसखबर लागताच पलंगावरी बैसली होती तेथेच ” अल्ला ! अल्ला ! खुदा, खुदा ! ” म्हणून अंग पलंगावरी टाकून रडत पडली. ” मुसलमानाची पादशाही खुदाने बुडविली,” ऐसा कित्येक विलाप करून बहुत शोक केला. पाद्शाहाजादीने तीन दिवस अन्न – उदक घेतले नाही. तसेच कुल मोठमोठे वजीर व लष्कर व कुल शहर दिलगीर जाहाले. म्हणू लागले कि, ‘ उद्या राजा येऊन शहर मारील व कोट घेईल ! ‘ ऐसे घाबरे जाहले. खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून मराठ्यांसी दिली असे वाटते ‘ असे म्हणो लागले.

प्रतापगडी देवीची स्थापना

त्या उपरांत मग राजियासी स्वप्नात श्री भवानी तुळजापुरची येऊन बोलू लागली कि, ‘ आपण अफझल तुझ्या हाते मारविला व कित्येक पुढेही आले त्यास पराभवात नेले. पुढेही कर्तव्य उदंड कारण करणे आहे. आपण. तुझ्या राज्यात वास्तव्य करावे. आपली स्थापना करून पूजा – पूजन प्रकार चालविणे. ‘

त्या उपरी राजियाने द्रव्य गाडियावरी घालून ; गंडकीनदीहून गंडकी पाषाण आणून श्री भवानी सिद्ध करून प्रतापगडावर देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला. देवीस रत्नखचित अलंकार भूषणे नानाप्रकारे करून दिली. महाल मोकाशे देऊन सचंतर हवालदार व मुजुमदार व पेशवे देवीचे करून महोच्छाव चालविला. नवस यात्रा सर्वदा तुळजापुरच्याप्रमाणे तेथे चालती झाली. आणि तुळजापूरचे यात्रेस लोक जातात त्यास दृष्टांत स्वप्ने होतात कि, ‘ आपण प्रतापगडास आहे. तेथे तुम्ही जाऊन दर्शन घेणे व नवस फेडणे, ‘ असे देवी बोलू लागली. मोठे जागृत स्थान जाहाले.

मोगलाईत धुंद उठवली

या नंतरि, विजापूरचा मातबर वजीर अफझलखान होत तो बुडविला, तेंव्हा पातशाही कमतर पडली, असे समजून राजीयाने विजापूरचे किल्ले तळकोकणात होते ते, सर्व घेतले. पन्नास – साथ गड घेतले. तळकोकण काबीज केले. वरघाटही घेतला. तेंव्हा लष्कर पागा सात हजार व शिलेदार आठ हजार, एकूण पंधरा हजार व हशम लोक बारा हजार ऐसी तोलदार फौज जमा जाहाली. लष्कर कुल जमाव घेऊन नेताजी प्लकर सरनोबत मोगलाईत स्वार्या करून, बालेघाट, परांडे, हवेली, कल्याण, कलबर्गे, आवसे, उदगीर, गंगातीर पावेतो मुलुख मारीत चालले. खंडण्या घेतल्या. मुलुख जप्त केला. औरंगाबादचे पुरे मारिले. मोगलांकडील फौजदार औरंगाबादेस होता तो चालून आला. त्याशी युद्ध जाहाले. हत्ती घोडे पाडाव केले. मोगलाईत धुंद उठविली. ऐसा पराक्रम करीत चालले.

संदर्भ – सभासद बखर, कृष्णाजी अनंत सभासद

]]>
https://shivray.com/%e0%a4%85%e0%a4%ab%e0%a4%9d%e0%a4%b2-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%a7/feed/ 0
सरसेनापती हंबीरराव मोहिते https://shivray.com/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4/ https://shivray.com/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4/#comments Mon, 16 Dec 2019 08:16:12 +0000 https://shivray.com/?p=2004
हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळतात.

स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवाजीशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजीपुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे शिवाजीचे अगदी जवळचे घराणे झाले.

यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.

महाराजांच्या द्वितीय पत्‍नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या.

ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकड प्रर्यंतच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला. यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. (अशीच एक तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात आहे. तिच्यावर सहा चरे पाडलेले आहेत. त्या तलवारीवर ‘ कान्होजी मोहिते हंबीरराव’ अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हंबीरराव मोहित्यांची नसून हंबीरराव ‘किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक वीराची आहे. परंतु जनमानसात असा समज आहे की ती तलवार ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ यांची आहे.)

हुसेनखानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते हे शिवाजीला गोवळकोंड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेंबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजीची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हंबीरराव मात्र नंतर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीचे निधन झाले. यावेळी हंबीरराव कऱ्हाड परिसरात छावणी टाकून होते.

शंभूराजेंच्या पाठीशी खंबीर मामा हंबीर
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच संभाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते. हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.

संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानंतर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते. यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्‍न केला. त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बहाद्दुररखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतु हंबीररावांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले.

सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र – लेखक डॉ. सदाशिव शिवदे)
जेधे शकावली, मराठा रियासत

]]>
https://shivray.com/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4/feed/ 3
तोरणा किल्ला – Torna Fort https://shivray.com/%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be-torna-fort/ https://shivray.com/%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be-torna-fort/#comments Thu, 26 Jul 2018 06:47:13 +0000 https://shivray.com/?p=1994 किल्ल्याची ऊंची: 1400
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा: पुणे
श्रेणी: मध्यम

शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव “तोरणा” पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.

पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत. तर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.

इतिहास:
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन येथे शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला, त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांनी स्वराज्यसाठी बलिदान दिल्यानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.

पोहोचण्याच्या वाटा:
पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई – बंगलोर हायवे (NH-4) वरील पुण्या पुढील नसरापूर फाटा गाठावा. पुण्या पासून नसरापूर ३६ किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे.

राहाण्याची सोय: नवीन बांधण्यात आलेल्या सदर मध्ये साधारण २० ते ३० लोकांची सोय होऊ शकते. तसेच गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय: जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय: मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ:
१) वेल्हे मार्गे अडीच तास लागतात. २) राजगड – तोरणा मार्गे ६ ते ८ तास लागतात.

]]>
https://shivray.com/%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be-torna-fort/feed/ 2
दौलतमंगळ – Daulatmangal Fort https://shivray.com/bhuleshwar-daulatmangal-fort/ https://shivray.com/bhuleshwar-daulatmangal-fort/#comments Sun, 14 Jan 2018 07:08:57 +0000 https://shivray.com/?p=1985 दौलतमंगळ (Daulatmangal)
किल्ल्याची ऊंची : 2000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
पुणे – सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले आहे. हे मंदिर असलेल्या टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन शहाजीराजांच्या काळात दौलतमंगळ किल्लाची उभारणी करण्यात आली. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यावरुन या किल्ल्याला “दौलतमंगळ गड” हे नाव पडले असावे.

पुण्याहुन स्वत:च्या वाहनाने एका दिवसात जेजुरी आणि दौलतमंगळ गड उर्फ भुलेश्वर ही दोनही ठिकाणे पाहता येतात.

इतिहास :
पौराणिक आख्यायीके नुसार पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी येथेच नृत्य केले होते. येथेच त्यांचा विवाह होउन येथुनच ते कैलास पर्वतावर गेले होते. त्याठिकाणी भुलेश्वर मंदिर मंदिराची उभारणी १२ व्या शतकात यादवांनी केली.

१६ व्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांच्या तीन पुत्रांची निजामाने भर दरबारात हत्या केल्यावर शहाजीराजांनी निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इतर कुठल्या बादशाहाच्या पदरी राहाण्यापेक्षा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुणे ही शहाजी राजांना वडिलोपार्जित मिळालेली जहागिरदारी होती. आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर शहाजीराजांनी स्वारी केली आणि पुणे व आजुबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. शहाजीराजांच्या हल्ल्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने रायराव नावाच्या सरदाराला मोठी फ़ौज घेऊन पुण्यावर पाठवले. युध्दाच्या या धामधुमीत गरोदर असलेल्या जिजाबाईंना शहाजी राजांनी सुरक्षित अशा शिवनेरी किल्ल्यावर पाठवले. रायरावने पुण्यावर हल्ला करुन पुणे उध्वस्त केले. त्यावरुन गाढवाचा नांगर फ़िरवला.

मुरार जगदेव हे आदिलशहाच्या दरबारातील एक बडे सरदार होते. त्यांचे आणि शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते. आदिलशहाच्या फ़ौजांनी पुण्याची वाताहात केल्यावर मुरार जगदेवांनी १६२९ मधे पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन दौलतमंगळ किल्लाची उभारणी केली. त्यानंतर पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार दौलत मंगळ किल्ल्यावरुन पाहिला जात होता. मुरार जगदेवांची १६३५ मधे आदिलशहाने हत्या केली. त्यानंतर जिजाबाई व शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी करुन लालमहालातून कारभार पाहायला सुरुवात केल्यावर दौलतमंगळ किल्ल्याचे महत्व कमी झाले.
पहाण्याची ठिकाणे :
पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावापासून १० किलोमीटर अंतरावर दौलतमंगळ गड आहे. डांबरी घाट रस्ता थेट किल्ल्यावर जातो त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही. मंगळगडाचा विस्तार पूर्व पश्चिम असून उत्तरेकडील प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्यावर जात असताना वाटेत प्रवेशव्दाराच्या आधी २ बुरुज पाहायला मिळतात. तर पश्चिमेला एक बुरुज पाहायला मिळतो. कालौघात किल्ल्याची तटबंदी आणि इतर अवशेष नामशेष झाले आहेत. प्रवेशव्दाराच्या अलिकडे एक पायवाट असून तेथुन १५ मिनिटे चालत गेल्यास थेट भुलेश्वर मंदिरात पोहचता येते. पायवाटेच्या उजव्या बाजूला एक पडझड झालेली एक कमान आढळते. वाहनाने गेल्यास वाहने मंदिराच्या मागच्या बाजूला पार्क करून ५ मिनिटे चालत गेल्यास भुलेश्वर मंदिरात प्रवेश होतो. पायऱ्या चढताना उजव्या तसेच डाव्या बाजूला मूर्तीशिल्प आढळतात. समोरच मोठी घंटा असून त्याखाली कातळात कोरलेला कासव आहे. मंदिर बाहेरून निरखून पाहिल्यास घुमट आणि त्यावर असलेले खांब लक्ष वेधून घेतात. त्यावर बारीक नक्षीकाम तसेच विविध शिल्प कोरलेले आढळतात. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला गणेश प्रतिमा, तर डाव्या बाजूला विष्णू प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच एक भिंत आहे तिथून दोन्ही बाजूला जाणाऱ्या पायऱ्या असून तिथून मंदिरात प्रवेश होतो यावरून मंदिर दुमजली आहे असा भास होतो. मंदिरात काळ्या पाषाणामुळे थंड वातावरण जाणवते. तसेच मंदिरात अंधार जाणवतो. डावीकडील पायर्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास भव्य साधरणपणे ६ फूट उंच अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला कासव आहे. मंदिराच्या भिंती आणि त्यावरी नक्षी काम, विविध शिल्प, कोरीव मुर्ती लक्ष वेधून घेतात. भिंतींवर कोरलेल्या मुर्तींची नासधूस केलेली आढळते. नंदीचे दर्शन घेवून मंदिरात प्रवेश केल्यावर शिवलिंग आणि शिवप्रतिमेचे दर्शन होते. दर्शन घेवून त्याच मार्गाने बाहेर आल्यावर प्रदक्षिणा घालताना छोटी छोटी देवालये असून विठ्ठल रखुमाई, महादेव, गणेश यांचा समावेश आहे. प्रदक्षिणा घालून बाहेर पडल्यावर मंदिराच्या डावीकडे एक कोरीव वास्तू आहे. तिथूनच मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या असून छतावर असलेले खांब आणि घुमट, त्यावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. बाजूला एक घुमटाकृती वास्तू आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला घंटा ठेवली आहे. त्याबाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून दीपमाळ आहे. तसेच लांबलचक दगडी वास्तू ( कोठार) आहे. समोरच्या बाजूला छोटे एक महादेवाचे मंदिर आहे. त्याच दिशेला एक वडाच्या झाडाजवळ मंदिर असून दर रविवारी येथे प्रसाद वाटण्यात येतो. संपूर्ण मंदिर आणि गडाचा फेरफटका मारण्यास एक तास लागतो. मंदिरा जवळून आजूबाजूला असलेल्या पठाराचे विस्तृत दर्शन होते.
पोहोचण्याच्या वाटा :
स्वत:च्या वाहनाने पुणे सोलापूर महामार्गा वरून ( पुणे – हडपसर- उरळी कांचन ) साधारणपणे ४५ किलोमीटर गेल्यावर यवत गाव लागते. यवत गावात पोहोचल्यावर यवत पोलिस चौकीच्या अलीकडील उजव्या बाजुच्या पाटाच्या रस्त्याने दौलतमंगळ गडावर उर्फ भुलेश्वर मंदिरात घाटमार्गाने पोहोचता येते. यवत गावापासून भुलेश्वर मंदिर १० किलोमीटर अंतरावर आहे.

राहाण्याची सोय: गडाचा,मंदिराचा परिसर मोठा असून राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय: गडावर जेवण्याची सोय नाही. दर रविवारी भुलेश्वर मंदिरात प्रसाद असतो.
पाण्याची सोय: पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: यवत गावातून चालत जाण्यासाठी साधारणपणे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो.

साभार: ट्रेक क्षितीज संस्था

]]>
https://shivray.com/bhuleshwar-daulatmangal-fort/feed/ 1
रायगड https://shivray.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%97%e0%a4%a1-raigad-fort/ https://shivray.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%97%e0%a4%a1-raigad-fort/#comments Sun, 29 Oct 2017 06:03:15 +0000 https://shivray.com/?p=1981 shivaji-maharaj-holi-mal

किल्ल्याची ऊंची : 2900
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.

महाराष्ट्रात राहाणार्‍या प्रत्येक माणसाची एकदा तरी रायगड किल्ला पाहाण्याची इच्छा असते. आता रोप वे मुळे रायगड किल्ला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवाक्यात आलेला आहे.

इतिहास :
रायगडाचे प्राचीन नाव ’रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ’पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य, तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम होता. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ’रासिवटा’ व ’तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास ’नंदादीप’ असेही नाव होते. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता केला जात असे.

१५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला करुन मोर्‍यांचा धुव्वा उडवला. मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला; तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.

महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते,

’राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.’

याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे

१) रायगड  २) रायरी ३) इस्लामगड  ४) नंदादीप  ५) जंबुद्विप  ६) तणस  ७) राशिवटा  ८) बदेनूर ९) रायगिरी १०) राजगिरी ११)भिवगड १२) रेड्डी

१३) शिवलंका १४) राहीर १५) पूर्वेकडील जिब्राल्टर

शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना होती.
गडावरील राजसभेत दिनांक ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. दिनांक २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वत…:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.

कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ’शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’
इ.स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली.शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले.

रायगडाने अनुभवलेला अत्यंत दु…:खद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ’ते दिवशी पृथ्वीकंप जाहला अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’

पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु ७, इ.स १६८१, १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले.

इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला.

औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले.

झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ’इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.

पहाण्याची ठिकाणे:
१) पाचाडचा जिजाबाईंचा वाडा:-
उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायर्‍यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ’तक्याची विहीर’ असेही म्हणतात.

२) खुबलढा बुरूज :
गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ’चित्‌ दरवाजा’ म्हणत. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

३) नाना दरवाजा :
या दरवाजास ’नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध गैरसमजूतीने नाना फडणिसांशी लावला जातो. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा आहे. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत, त्यांस ’देवड्या’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

४) मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा: चित्‌ दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्‍यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

५) पालखी दरवाजा :-
रायगडावरील मनोर्‍यांच्या (स्तंभांच्या) पश्चिमेस तटबंदीत ३१ पायर्‍या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

६) राजभवन :-
राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या घरांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आ.हे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे, तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.

७) रत्नशाळा :-
राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

८) राजसभा :-
महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ’तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’

९) नगारखाना :-
सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायर्‍या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

१०) बाजारपेठ :-
नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ’होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत, मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.

११) शिर्काई देऊळ :-
महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ शिर्काई ही गडावरील मुख्य देवता होय.

१२) कुशावर्त तलाव:-
होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.

१३) टकमक टोक :-
बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.

१४) हिरकणी टोक :-
गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते, ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.

१५) महादरवाजा :-
महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ’श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ’श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ’विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ’जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

१६) चोरदिंडी :-
महादरवाजा पासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी (चोर दरवाजा) बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्‍या आहेत.

१७ गंगासागर तलाव:-
हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० – ६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.

१८) हत्ती तलाव :-
महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो, तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्‍या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.या तलावाच्या तळाला दरीच्या दिशेला एक दगड बसविलेला होता. उन्हाळ्याच्या शेवटी हा दगड काढून तलाव रिकामा करून साफ केला जात असे. आज हा दगड नसल्यामुळे तलावात पाणी साठत नाही.

१९) स्तंभ :-
गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. पूर्वीच्या काळी हे मनोरे पाच मजली होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.

२०) मेणा दरवाजा :-
पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात, ते आहेत राण्यांचे महाल. राण्याच्या महालात असलेले शौचकुप पाहाण्यासारखे आहेत. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

२१) जगदीश्वर मंदिर :-
बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे,

‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’

या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे:

श्री गणपतये नम…: ।
प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया
श्रीमच्छत्रपते… शिवस्यनृपते… सिंहासने तिष्ठत…:।
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
स्तभे… कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावƒन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।२।।

याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे,
’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद्‌ छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’

२२) महाराजांची समाधी :-
मंदिराच्या पूर्व दरवाजा पासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी सभासद बखर म्हणते,

’क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले, तेथे काळ्या दगडाच्या चिर्‍याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’

दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे. तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.

२३) वाघदरवाजा:
कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ’किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या.’
हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
पोहोचण्याच्या वाटा:
१) मुंबई – गोवा मार्गावरील महाड बस स्थानकामधून:
मुंबई – गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानका बाहेरून जीपगाड्याही जातात. बसने आल्यावर चित्‌ दरवाज्यापाशी, (जो आता अस्तित्वात नाही) जिथे पायर्‍या सुरू होतात. तेथे उतरून पायर्‍यांनी गडावर जाता येते. जवळजवळ १५०० पायर्‍या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.

२ नाना दरवाजाकडून: नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायर्‍यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक पायवाट जाते त्या वाटेने गेल्यास नाना दरवाजाने आपण गड चढू शकतो.

३ रोप वे: आता गडावर जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून १० ते १५ मिनिटांत आपण गडावर पोहोचू शकतो.

राहाण्याची सोय: रायगड किल्ल्यावर एमटीडीसीच्या बंगल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राह्ण्याची सोय होऊ शकते. महाराष्ट्र राज्य पर्यटन केंद्र, नरिमन पॉइंट, मुंबई-२१ यांच्याशी संपर्क केल्यास किंवा एमटीडीसीच्या साईट वरुन ऑनलाईन बुकींग केल्यास राहण्याची सोय होऊ शकेल.

जेवणाची सोय: पायथ्याच्या पाचाड गावी श्री देशमुख यांचे उपहारगृह आहे. पाचाडचा फोन (०२१४५) २७४८४८, ९४२२६८९८९७,९६०४१६१७१८ .गडावर एम.टि.डी.सीचे रेस्टॉरंट आहे. गडावरील काही गाईड त्यांच्या घरात जेवणाची सोय करतात.

पाण्याची सोय: गंगासागर तलावाचे पाणी आणि हनुमान टाक्यातले पाणी पिण्यासाठी वापरले जाते. २०१५ साली दोनीही पाणीसाठे खराब झालेले आढळले.

जाण्यासाठी लागणारा वेळ: पायर्‍यांच्या मार्गाने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.

]]>
https://shivray.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%97%e0%a4%a1-raigad-fort/feed/ 2
छत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट https://shivray.com/%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f/ https://shivray.com/%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f/#comments Fri, 02 Jun 2017 05:20:27 +0000 https://shivray.com/?p=1975 http://marathiactors.com/2017/06/riteish-deshmukh-marathi-movie-chhatrapati-shivaji-cost-of-over-rs-225-crore/]]> तब्बल 225 करोड़ पेक्षा जास्त रक्कम खर्च करून बनतोय आपल्या महाराजांवर चित्रपट “छत्रपती शिवाजी” नक्की पहा –> http://marathiactors.com/2017/06/riteish-deshmukh-marathi-movie-chhatrapati-shivaji-cost-of-over-rs-225-crore/

ritesh

]]>
https://shivray.com/%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f/feed/ 1
शिवरायांचे आज्ञापत्र https://shivray.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-aadnyaptra/ https://shivray.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-aadnyaptra/#comments Mon, 17 Oct 2016 07:38:46 +0000 https://shivray.com/?p=1960
छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र

छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र

छायाचित्र साभार महाराष्ट्र वन विभाग

]]>
https://shivray.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-aadnyaptra/feed/ 3
बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६ https://shivray.com/nature-photography-workshop/ https://shivray.com/nature-photography-workshop/#respond Wed, 10 Aug 2016 06:51:08 +0000 https://shivray.com/?p=1951 Get ready to improve your skills in photography.
on field basic nature photgraphy workshop on sunday Septemeber 4 2016 by 10 am to 4 pm.

बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप : (नेचर फोटाग्राफी )
हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे.
यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात.
कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात.
हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य असून प्रवास व जेवण खर्च स्वतः करावयाचा आहे.
वेळेत पोहचणे बंधनकारक आहे.
DSLR कॅमेरा असणे गरजेचे आहे.
तारीख व वेळ : रविवार दि. ४ सप्टेंबर २०१६ सकाळी १० ते ४
स्थळ : किल्ले लोहगड
येण्याचा मार्ग : १) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी.
२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा-भांगरवाडी-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी.
संपर्क : ९८९०४३९०६२ / ९८९०४६६८३३
Event Link: https://www.facebook.com/events/1054849921264679/

]]>
https://shivray.com/nature-photography-workshop/feed/ 0
मोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट) https://shivray.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ab%e0%a4%a4-%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a5%89%e0%a4%aa/ https://shivray.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ab%e0%a4%a4-%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a5%89%e0%a4%aa/#comments Wed, 03 Aug 2016 02:41:35 +0000 https://shivray.com/?p=1943 Get ready to improve your skills in photography.
on field basic nature photgraphy workshop on sunday August. 7 2016 by 10 am to 6 pm.

बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप : (नेचर फोटाग्राफी )
हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे.
यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात.
कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात.
हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य असून प्रवास व जेवण खर्च स्वतः करावयाचा आहे.
वेळेत पोहचणे बंधनकारक आहे.
DSLR कॅमेरा असणे गरजेचे आहे.
तारीख व वेळ : रविवार दि. ७ ऑगष्ट २०१६ सकाळी १० ते ६
स्थळ : किल्ले लोहगड
येण्याचा मार्ग : १) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी.
२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा-भांगरवाडी-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी.
संपर्क : ९८९०४३९०६२ / ९८९०४६६८३३
Event Link: https://www.facebook.com/events/1054849921264679/

]]>
https://shivray.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ab%e0%a4%a4-%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a5%89%e0%a4%aa/feed/ 1