Home » महाराष्ट्रातील किल्ले (page 2)

महाराष्ट्रातील किल्ले

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’
या शब्दांत सह्याद्रीच्या डोंगर-दर्‍यात वसलेल्या महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन गोविंदाग्रजांनी केलेले आहे.
महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रांगांमध्ये घनदाट जंगलांची निसर्गसंपत्ती लाभलेली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास ह्या दर्‍या-खोर्‍यांशी, डोंगरांशी जोडलेला आहे. या डोंगर रांगांतील किल्ले हा इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. या किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि यांच्या साहाय्याने स्वराज्य स्थापन झाले. हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देताताच तसेच गिर्यारोहण व पर्यटन यादृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.

दुर्गदुर्गेश्वर रायगड

महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी ...

Read More »

गोनीदांचे दुर्गप्रेमींना पत्र

G N Dandekar गोनीदा

गडे हो ! अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून या दुर्गदर्शनासाठी या. आपापले उद्योग एक्या अंगास सारून या. दो चौ दिसांची सवड काढून या. पण हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे, रान तुडवण आहे, स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा, असतं कळा कळा तापणार ऊनं,असतात मोकाट डोंगरदरे, पण हे ...

Read More »

महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

kille sanvardhan fort restoration

स्वराज्यात साडेतीनशे किल्ले आहेत. त्यातला प्रत्येक किल्ला फक्त एक वर्ष जरी लढला तरी स्वराज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाला एक हयात पुरणार नाही. – स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. जे किल्ले सोपे व अतिप्रसिद्ध आहेत त्यावर गडप्रेमी जेव्हा इतिहासाच्या व महाराजांच्या प्रेमाखातर जातात तेव्हा त्यांना “बेगड” प्रेमी लोकांनी करून ठेवलेले उत्पात बघायला मिळतात, या हरामखोर मंडळींनी कोरलेले घाणेरडी रंगरंगोटी पहिली तर कडेलोट किंवा ...

Read More »