किल्ल्याची ऊंची : 2420
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: कोल्हापूर
जिल्हा : कोल्हापूर
श्रेणी : मध्यम
पारगड हा महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेला नितांत सुंदर किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ अंदाजे ४८ चौरस एकर आहे. गडाला पूर्व, पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक ताशीव कडयाची तटबंदी आहे. दक्षिणेला थोडया उतारा नंतर खोल दरी आहे. सन १६७६ मध्ये पोर्तुगीजावरील स्वारीवरुन परत येताना शिवरायांनी हया डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्व ओळखले आणि पोर्तुगीज, अदिलशहा व सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसविण्यासाठी हा किल्ला वसविला. शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत किल्ल्याची वास्तुशांत व गडप्रवेश झाला. त्यावेळी किल्लेदार रायबा मालुसरे व त्र्यांच्या ५०० सहकार्र्यांना राजांनी आज्ञा केली की, ‘चंद्र सुर्य असेतो, गड जागता ठेवा’. राजांच्या या आज्ञेचे पालन या गडावरील मावळर्यांनी अद्याप पर्यंत केले आहे. स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव “पारगड” ठेवण्यात आले होते.
इतिहास :
गोव्याच्या पोर्तुगिजांवर वचक ठेवण्यासाठी १६७६ मध्ये शिवरार्यांनी या गडाची निर्मिती केली.या मोक्याच्या किल्ल्यावर त्र्यांनी तानाजीचा मुलगा,रायबा मालुसरे याला किल्लेदार म्हणून नेमले.गडाची वास्तुशांत व गडप्रवेश यासाठी महाराजांचा या गडावर निवास होता. १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान र्यांनी गड जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या लढाईत तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे र्यांना वीर मरण आले. त्र्यांची समाधी गडावर आहे. नंतरच्या काळात पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. गडावर उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे ब्रिटीशांनी सुरु केलेला तनखा, गडावरील मावळर्यांच्या कुटुंब प्रमुखाला १९४९ सालापर्यंत मिळत होता. परंतु भारत सरकारने तो खंडीत केला व तेव्हापासून सर्व गडकरी गडावर कोणतेही उत्पन्नाचे नसल्यामुळे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही गडावर स्वाभिमानाने दिवस काढत आहेत.
पहाण्याची ठिकाणे :
सन २००२ मध्ये विद्यमान गडकर्र्यांनी सरकार दरबारी केलेल्या अथक प्रयत्नाने गडावर जाण्यासाठी थेट डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याने गडाचा उत्तरेकडील कडा डावीकडे ठेवून पुढे गेल्यावर डाव्या हाताला गडाचा शिवकालीन पायर्याचा राजमार्ग लागतो. सरळ जाणारी सडक घोड वाटेने सर्जा दरवाजा मार्गे गडावर जाते व उजवीकडून गोव्याला जाते. शिवकालीन ३६० पायर्या चढून गेल्यावर सपाटीवर तोफांचे अवशेष व डौलाने फडकणारा भगवा ध्वज आपले स्वागत करतो.
गडावर प्रवेश करताच ३ तोफा आपले स्वागत करतात. डाव्या हातास मारुतीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच घडीव दगडातील समाधी आहे. पुढे गेल्यावर पारगडवासिर्यांची वस्ती सुरु होते. पायवाटेने पुढे गेल्यावर शाळा व त्यासमोर गडाची सदर आहे. या सदरेवरच शिवरार्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. पुढे गेल्यावर उजव्या हातास गडकर्र्यांनी अत्यंत जिद्दीने जिर्णोध्दार केलेले भवानी मातेचे भव्य मंदिर लागते. या मंदिराच्या गाभार्यात शिवकालीन मूळ दगडी मंदिर आहे. या मंदिरातील भवानी मातेची मूर्ती नेपाळच्या गंडकी शिळेपासून तयार केली असून, ती प्रतापगडावरील भवानी मातेची आठवण करुन देते. भवानी मंदिरापलिकडे प्राचिन गणेश मंदिर आहे. गडाच्या तट फेरीस सुरवात केल्यावर आपणांस गुणजल, महादेव, फाटक व गणेश तलाव लागतात. गडावर शिवकालीन १७ विहिरी आहेत, पैकी ४ चांगल्या अवस्थेत आहेत बाकी बुजलेल्या अवस्थेत आहेत. तटाच्या पश्चिमोत्तर फेरफटक्यात आपणास भालेकर, फडणीस व महादेव असे ३ डौलदार बुरुज दिसतात. याशिवाय माळवे, भांडे, झेंडे बुरुज अशी नावे असलेले आणखी बुरुजही गडास आहेत. गडाच्या उत्तरेकडील बाजूस दरीच्या काठावर महादेव मंदिर आहे. मुलांच्या खेळण्याच्या पटांगणा पलिकडे तुळसाबाई माळवे र्यांची १६८० मधील समाधी आहे, तर गडाखालील मिरवेल या गावात घोडदळ पथकाचे प्रमुख खंडोजी झेंडे र्यांच्या पत्नी म्हाळसाबाई र्यांचे स्मारक आहे.
पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे र्यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडाजी शेलार, शिवकाळातील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे र्यांचे वंशज, कान्होबा माळवे इत्यादी वास्तव्यास आहेत. बाळकृष्ण मालुसरे व्यावसायानिमित्त अनगोळ, बेळगावला असतात. त्र्यांचेकडे तानाजींची तलवार व शिवरार्यांच्या गळयातील सामुद्री कवडर्यांची माळ जतन केलेली आहे. अशा फक्त ५ माळा महाराष्ट्रात उपलब्ध असून, त्या सातारच्या राजवाडयात, प्रतापगडावरील भवानीच्या गळयात, कोल्हापूर महालक्ष्मीच्या गळयात व तुळजापूरच्या भवानीच्या गळयात आहेत. माघी महिन्यातील उत्सवात व दसर्याच्या उत्सवात गडावरील मावळे आपल्या पूर्वजांची शस्त्रास्त्रे प्रदर्शित करतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१) कोल्हापूरहून थेट किंवा बेळगावमार्गे चंदगड गाठायचे. चंदगड वरून इसापूर अशी एसटी आहे. इसापूरहून थेट पारगडावर जाता येते. चंदगडवरून पारगड अशी एसटी सुद्धा आहे. ती आपल्याला थेट पारगडच्या पायथ्याशी आणून सोडते.
२) स्वत:चे वाहन असल्यास बेळगाव – शिनोळी – पाटणे फाट्यामार्गे मोटणवाडी गाठायची. मोटणवाडी पासून पारगड साधारण पाऊण तास गाडीचं अंतर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी स्वत:चे वाहन ठेवण्याची सोय देखील आहे.
राहाण्याची सोय :
गडावर निवासाची व्यवस्था आहे.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही
पाण्याची सोय :
गडावरील तलावात व विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे २ ते ३ तास लागतात.
सूचना :
पारगडावरील खालील गडकर्र्यांशी संपर्क साधल्यास या किल्ल्याविषयी अधिक माहिती मिळू शकते.
१ श्री बाळकृष्ण मालुसरे, वास्तव्य अनगोळ, बेळगांव ०८३१ २४८१३७७
२ श्री कान्होजी माळवे, वास्तव्य मुंबई ९८२१२४२४३०
३ श्री दिनानाथ शिंदे
४ श्री अर्जुन तांबे
माहिती साभार: ट्रेक क्षितिज संस्था
Review Overview
User Rating!
Summary : पारगडावरील खालील गडकर्र्यांशी संपर्क साधल्यास या किल्ल्याविषयी अधिक माहिती मिळू शकते. १ श्री बाळकृष्ण मालुसरे, वास्तव्य अनगोळ, बेळगांव ०८३१ २४८१३७७ २ श्री कान्होजी माळवे, वास्तव्य मुंबई ९८२१२४२४३० ३ श्री दिनानाथ शिंदे ४ श्री अर्जुन तांबे