Home » वीर मराठा सरदार

वीर मराठा सरदार

स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले अशा शूर वीर मराठा सरदारांविषयी

सरसेनापती हंबीरराव मोहिते

hambirrao mohite

हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले. संभाजी मोहिते व ...

Read More »

शूर शिलेदार येसाजी कंक

Yesaji Kank - येसाजी कंक

चौऱ्याऐंशी मोसे खोऱ्यातील वतनदार बाजी पासलकर, राजे शिवाजी महाराज व दादोजी पंत कोंडदेवांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यासाठी रायरेश्वर मंदिराची निवड केली. श्रावणी सोमवारच्या शुभ दिनी पंतांनी दिलेल्या आमंत्रणानुसार कानद खोऱ्यातले झुंझारराव मरळ, मुठा खोऱ्यातले पायगुडे, रोहिड खोऱ्यातले कान्होजी जेधे आदी सुभेदार व राजांचे बालमित्र तानाजी मालुसरे, गणोजी दरेकर, विठोजी लाड आणि येसाजी कंकसहित अनेक मावळे रायरेश्वराच्या मंदिरात जमले आणि महादेवाच्या ...

Read More »

अजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू

प्रयागजी प्रभू - Prayagji Prabhu

मोगल म्हणजे भोंगळ! आणि औरंगजेब म्हणजे त्यांचा बादशहा! दख्खन जिंकण्याकरिता त्याने केवढा पसारा मांडला होता! लाखो माणसं, हजारो घोडे, अमाप धान्य, अलोट खजिना, तंबू, दारुगोळा, जनावरं, कापड.. अश्श्याला तोटा नव्हता; फक्त अकलेचाच दुष्काळ होता आणि म्हणूनच वर्षानुवर्ष मराठ्यांच्या मागं धावून सुद्धा शेवटी त्याच्या हाती आली गोळाबेरीज भोपळाच! औरंगजेबाच्या गबाळ्या कारभाराचा फायदा मराठे मात्र भरपूर घेत होते. लुटायला, बनवायला आणि खेळवायला ...

Read More »

पोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक

छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज

छत्रपती संभाजी महाराजांचा गोव्याच्या पोर्तुगीजांशी तह पूर्ण झाला आणि त्याच दरम्यान औरंगजेबाने आपला दूत त्यांच्याकडे रवाना केला. औरंगजेबाने गोवेकरांना मराठ्यांच्या किनारपट्टीवर हल्ले करण्याची सुचना केली. गोव्याच्या फिरंग्याना सुद्धा दक्षिण कोकण हवेच होते, त्यात त्यांना कुडाळच्या सावंताची आणि वाडी वेंगुर्ल्याच्या देसायांची फूस होतीच, म्हणुनच संभाजी महाराजांशी झालेला तह मोडून फिरंग्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचे ठरविले. फोंडा किल्ला लढ़विण्याची जबाबदारी येसाजी कंक आणि ...

Read More »

जेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा

नागोजी जेधे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय दरम्यान सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्यावर बिजापुरच्या पश्चिमेकडिल पठाणंची फळी गारद करण्याची जबाबदारी महाराजांनी सोपविली होती. येलबुर्ग्याला हंबीरावांनवर पठाणाची प्रचंड फौज चालून आली. अब्दुलरहीमखान मियान स्वतः आघाडीच्या हत्तीवर बसून या फौजेचे नेतृत्त्व करीत होता. पण या पठानांच्या सेना सागराला पाहून मराठे किंचित सुद्धा घाबरले नाहीत, उलट युद्ध गर्जना करीत ते शत्रुवर तुटून पडले. मराठ्यांचा आवेश असा ...

Read More »

काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड

तटसरनौबत जावजी लाड

ऑक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचड मारित सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोचला. गडास त्याने वेढा घातला; ही बातमी समजताच बाजीराव पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. जानेवारी १७३४ महिन्यात काळ नदीच्या खोर्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. गडावरच्या मराठ्यांनाही चेव चडला. तटसरनौबत जावजी लाड यांनी महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चडविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य सैरावैरा पळू ...

Read More »

सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण

शंकराजी नारायण

शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७ व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड , राजगड ह्यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले. मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. ...

Read More »

सरखेल कान्होजी आंग्रे

सरखेल कान्होजी आंग्रे - Sarkhel Kanhoji Angre

कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे ...

Read More »

वीर शिवा काशीद

शिवा काशीद - Shiva Kashid

वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत ...

Read More »

बाजीप्रभू देशपांडे

Bajiprabhu Deshpande

बाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट १६१५ रोजी सिंध, ता. भोर, जि. पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे बाजी सरनोबत होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज ...

Read More »