वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते.
दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते.
वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले.
दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते.
झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखाकत होत्या, पालखी धावतच होती, नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता? ठरल्या प्रमाणे हेरलेली पालखी घेऊन १५-२० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली.
शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. थोड्याचवेळात त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले, आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजीराजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले! काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले की हा तर शिवा काशीद आहे. सिध्दीने त्यास विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले शिवाजीराजेंसाठी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिध्दीने शिवा काशिदांचे शीर कलम करण्याचा आदेश फर्मावला.
आता पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला, नुसताच मनस्ताप, पश्चात्ताप आणि चिडचिड, घोड्याला टाच मारून अवघे एल्गारत निघाले वाटेतील गुढगा गुढगा चिख्खल तुडवीत.
इतिहास शिवा काशिदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापि विसरु शकणार नाही, कारण शिवा काशिद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.
स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारली आहे. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे, शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल्स साकारली आहेत. पहिल्या म्यूरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग चितारला आहे. दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राजदिंडीमार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे. तिसऱ्या म्युरल्समध्ये वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटला आहे. बारा बाय दहा फूट आकारातील हे म्यूरल्स आहेत.
Review Overview
User Rating !
Summary : शिवाकाशिद वीर मरणास प्राप्त झाले, पण मरण्याआधी प्रहर दोन प्रहर का होइना एक सामान्य मावळा राजा झाला. स्वत: मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचा राजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाईल. धन्य ते शिवराय आणि धन्य त्यांचे लाख मोलाचे मावळे.
शिवा काशीद हे एक अस्सल कलाकार त्यांच्या समोर मृत्यू असताना राज्या ची भूमिका केली त्यांच्या नावे आम्ही अभिनय पुरस्कार देतो
माझी आई ६० वर्षाची आहे .. तिची जन्म तारीख सापडेना … तुम्ही वीर शिवा काशिद ची ३७० वर्षा पूर्वीची जन्म तारीख विचारता.
खाण्या साठी वनवन करावी लागत होती.. जन्म नोंद कोण ठेवणार
कोणीही मराठा न्हावी समजला कमी लेखत नाही.
हा चुकीचा गैर समज आहे. जी जात नाही ती जात असते.
न्हावी समाज व मराठा समाज यात डॉक्टर इंजनिअर त्या त्या योग्तेनुसार मुला व मुलींचे लगीन झालेले आहे
[email protected]
शिवा काशीद यांचे जन्म तारखेचा काही पुरावा आणि तारीख असेल तर कळवावे…
पन्हाळ गडावर जे धान्य कोठार आहेत ज्याला अंबरखाना म्हणून ओळखले जाते त्या बाबतीत राजा भोज च्या काळातील इतिहास हा जखु तेलीन यांनी गर्भावस्थेत स्वतःहून बळी दिला. पण त्यांचा इतिहास या मध्ये दिसत नाही…जेव्हा बुरुंज अनेक वेळा ढासळत होता तेव्हा राजा भोज यांनी पंचांग बघितले.तेव्हा एका गर्भवती स्त्री चा बळी द्यावा लागेल.परंतु राजा भोज याना निष्पाप यांचा बळी देणे उचित वाटले नाही परंतु किल्ल्याची सुरक्षा म्हणून त्यांनी दवंडी दिली की कुणी गर्भवती स्री स्वतःहून तयार असेल तर तिचा बळी दिला जाईल.तेव्हा जखु तेलीन ही स्त्री पुढे आली व तिने सहमती दर्शवली आणि तिचा बळी देण्यात आला..तिच्या स्मरणार्थ धान्याचे जे तीन कोठार आहेत त्यांना तीच व तिच्या 2 मुलींची नावं देण्यात आली..त्याच कोठारांना आता गंगा यमुना सरस्वती असे संभोदले जाते.. त्या वीर मातेची समाधी अजूनही तेथे एक शिळेवर आहे… मग हा इतिहासही नमूद करावा असे वाटते…
महेशराव माहिती बद्दल धन्यवाद, याचा काही पुरावा असेल तर याविषयी नक्की प्रसिद्ध करू. तूर्तास काल्पनिक कथा म्हणून पन्हाळा माहितीत सहभाग करून घेऊ.
ही घटना कधी ची आहे सांगू शकता का दादा, शिवाजी महाराजांच्या काळातील आहे का त्या ही पहीलीची
वीर शिवा काशिद यांच्या पत्नीचे नाव काय होते आणि त्यांचे निधन कोणत्या गडावर झाले ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
श्री रणजीत देसाई यांच्या पावनखिंडी या कादंबरीत महाराजांनी खूप सुंदर सांगितले आहे राजे म्हणतात जेव्हा गडावरती सुरक्षित ठिकाणी धन ठेवायचे असेल तेव्हा रात्री अशा ठिकाणी दोन माणसे ते धन पुरून येतात आणि दुसऱ्या दोन मारेकर्यांना तर्फे त्या दोन लोकांना मारले जाते आणि जिथे धन पुरले आहे तिथे टाकले जाते मग काही दिवसांनी त्याजागी रात्रीच्या मशाली फिरवले जातात ही पद्धत चाणक्य काळापासून चालू आहे त्याचा अनुभव तोरणा गडावर ती माचीचे काम करत असताना आला आणि तसाच अनुभव मोहनगड (पूर्वीचे जास्त लोड गड) याच्या माची वर भेटला जिथे त्या जागा बाधित होत्या जसे भुताचा माळ वेताळाचा माळ अशा नावाने त्या गोष्टी पसरविल्या जात होत्या.
राजे म्हणतात “अशा जागा दिसल्या की आम्हाला धन दिसतं”
धन्यवाद
Shiva kashidanche balidan vyarth jaanar nahi # Jo paryant sury Chandra aahe to paryat shivray aani swarajya Amar rahanar # Mitra no etihas vacha tr tumhala jagnyat ahe jinkay sathi sfurti milelel #
इयत्ता 4थी च्या इतिहास पुस्तकात उल्लेख आहे तो असा। दोन पालख्या सजविण्यात आल्या एक पालखीत शिवराय व दुसरीत शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती ।नंतर पालखी पकडली सोंग उघडे पडले।नंतर सिद्धीने त्यांना ठार केले।शिवरायांच्या राज्यकारभारात केशभूषा करणारी व्यक्ती त्यांचेही नाव शिवाजी होते असा उल्लेख आहे।पूर्ण नावाचा उल्लेख का केलेला नाही? असो नरवीर शिवाजी काशीद यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले।अशा या नरवीरास मनाचा मुजरा।
खुप सुंदर माहिती आहे
खुप छान माहित दिल्या ईतिहासातील.
पण माला माहिती आहे त्याप्रमाणे सि. जोहर सोबत तहाची बोलणी केली गेली कि, शिवाजी राजे सि. जोहरला भेटणार पण गडा भोवती टाकलेल्या वेठा शिथील करण्यात यावा. वेठा शिथील झाल्यानंतर दोन पालख्या निघाल्या एक सि. जोहरच्या शामियाणा कडे व दुसरी गुप्त, कडाकपारी चिरीत मार्गस्थ झाली.
panhal gad pasun vishal gad che antar nakki kiti ahe ?
pawan khinda kiti distancevwar lagti ?
hya sarva jaga kolhapur madhe ahet ka
पन्हाळ गडापासून विशाळगड पायथा ६२ किमी आहे.
पन्हाळगडापासून पावनखिंड ४६ किमी आहे.
पन्हाळगड व पावनखिंड देशावर येतात तर विशाळगड कोकणात येतो. विशाळगडाच्या पायथ्याशी जी दरी आहे ती देश व कोकण यामधील विभागणी रेषा आहे.
Shivrayansathi Jya virane Balidan dile tyala koti koti Salaam……….
Jay Shiva Kashid
Jay Shivray……..!
जर शिवा काशीद या न्हावी समाजाचे माणसाचे योगदान आहे तर मग मराठा समाज न्हावी समाजाला कमी का लेखतो. न्हावी आणि मराठा समाजात लग्ने आणि सोयरिकी का होत नाहीत. सर्व हिंदूंना सामान दर्जा का नाही?
माफ करावे या प्रकारच्या या चर्चेसाठी हे व्यासपीठ नाही. इतिहासासंदर्भातील काही माहिती हवी असल्यास जरूर विचारावे, माहिती देण्याचा शक्य त्या परीने प्रयत्न करू. धन्यवाद.
सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन केले आहे ते बरोबर आहे का…?
माहिती द्या
Admin भाऊ, एका ठिकाणी वीर शिवा काशीद यांच्याबद्दल उल्लेख करताना शिवा न्हावी असा केला आहात. शिवा होते म्हणून आज महाराज वाचले. आणि ते वाचले म्हणून तुम्ही मी हिंदू म्हणून वाचलो. तरी आपणाला विनंती आहे की वीर शिवा काशीद यांचा उल्लेख न्हावी असे करू नये.
धन्यवाद.
श्रीकांत ख्याडगी, हिंदू युवा उत्थान समिती, महाराष्ट्र
8698723231
सहमत, दुरुस्ती केली आहे. धन्यवाद
का करू नये होते जर ते व्हावी अभिमानाची गोष्ट आहे ती
Point to noted
Karan aaplya rajya ghatnetch saman kayada nahi
कोणीही मराठा न्हावी समजला कमी लेखत नाही.
हा चुकीचा गैर समज आहे. जी जात नाही ती जात असते.
न्हावी समाज व मराठा समाज यात डॉक्टर इंजनिअर त्या त्या योग्तेनुसार मुला व मुलींचे लगीन झालेले आहे
Yes for establishing swaraj shivaji Maharaj had a great reliable source like SHIVA KASHID
…… SALUTE
शिवा काशीद बदल सांगावं ठेवढं कमी. पण जर तुम्ही तारखां वर लक्ष त्याला तर यात जरा गफलत आहे कृपया सुधारून टाकावी
चूक लक्षात आणून दिल्यावद्दल धन्यवाद, जन्मतारखे संदर्भातील गोष्टी तपासून सुधारणा करण्यात येईल. पुनश्चः धन्यवाद.
माझा नंबर मो. 9850040663
सर त्यांची जन्म तारीख नहिय यात.
@स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही आता. धन्यवाद.
Maharajanche mavale he samanya navate he Shiva Kashid chya balidanane siddha hote
Shiva Kashid cha Jay
Shivaji Maharaj cha Jay
Sambhaji Maharajabha Jay
Sarva Mavalyancha Jay