Home » काव्य » मराठ्यांची कीर्ती काव्यरुपात
कुसुमाग्रज - V V Shirwadkar
कुसुमाग्रज - V V Shirwadkar

मराठ्यांची कीर्ती काव्यरुपात

समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी ।
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।।

घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले ।
तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले ।
खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले ।
बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी ।
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।।

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची ।
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची ।
पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची ।
जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी ।
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।।

करवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा ।
कलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा ।
करात कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा ।
शिंग मनोरयावरी वाजता उभी छावणी घरोघरी ।
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।।

पोलादी ‘निर्धार’ अमुचा असुरबळाची खंत नसे ।
स्वतंत्रतेच्या संग्रामाला ‘विजया’ वाचून अंत नसे ।
श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे ।
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ।
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।।

भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो ।
रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो ।
हे सह्याचाल, हे सातपुडा । शब्द अंतरा विदारतो ।
त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ अमुच्या जळे उरी ।
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।।

जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे ।
वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे ।
तळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे ।
स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी ।
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।।

– कविवर्य कुसुमाग्रज

कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर झाले. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यु इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातुन पास झाले.
१९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा ‘रत्नाकर’ मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत.

१९४२ साली प्रसिध्द झालेला ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भूरळ घालते. ‘मराठी माती’, ‘स्वागत’, ‘हिमरेषा’ यांचबरोबर ‘ययाती आणि देवयानी’ व ‘वीज म्हणाली धरतीला’ ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली ‘वैष्णव’ ही कांदबरी व ‘दूरचे दिवे’ हे प्रसिध्द झाले.

‘नटसम्राट’ ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे स्वागत केले त्याला तोडच नाही. अत्यंत नाजूक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले.

संदर्भ: कुसुमाग्रज

समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी । रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।। घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले । तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले । खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले । बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी । रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।। या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची । दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची । पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची । जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी । रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।। करवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा । कलम कागदावरी राबवो…

Review Overview

User Rating !

Summary : कुसुमाग्रजांना गरजू व गरीब लोकांबद्दल खूप कळवळा होता. आदिवासी लोकांबद्दल जी माया होती ती त्यांच्या कार्यातून दिसून येते. यातूनच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची योजना साकारली. अनेक स्वंयसेवक उभे करून त्यांनी अनेक योजना उभ्या केल्या. त्यात प्रौढ शिक्षण, आरोग्यसुविधा, सांस्कृतिक व क्रिडा शिबीरे यांचा समावेश असे. प्रतिष्ठानचे नाशिकच्या आसपासची ७ खेडी घेऊन हे उपक्रम राबवले.

User Rating: 3.71 ( 5 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.