सदरचे पत्र अस्सल असून, पत्राच्या माथ्यावर प्रतिपच्चंद्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मर्यादेयं विराजते ही समाप्तिमुद्रा आहे, पत्रावरील दोन्ही शिक्के सुस्पष्ट आहेत.
पत्राची तारीख २६ जमादिलाखर, सु|| समान अर्बेन अलफ (म्हणजे शुहूर सन १०४८) अशी आहे, खरे जंत्रीप्रमाणे ती १९ जुलै १६४७ अशी येते.
प्रतिपच्चंद्र
लेखेव वर्धीष्णूर्वि
श्र्ववंदिता|| शाह्सू
नो: शिवस्यैषा मुद्रा
भद्राय राजते||
१. अजरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे दामदौलतहू बजानिब कारकुनानी
२. हाळ व इस्त्कबाळ व देशमुखानी प|| पुणे बिदानद के सुहूर सन समान अर्बेन
३. रवां सुद अलफ बो| माहादभट बिन मुद्गलभट पुरंदरे सेकीन
४. कसबे मजकूर हुजूर येऊन माळूक केले जे आपणास
५. बदल इमान दर माहाळ
६. जमीन देहाय गावगना चावर गजशरायेनी
७. ३
८. मौजे परवती देखील नख्तयाती व बाजे मौजे पिंपरी न|| रहाटणी बाबा महसूळे
९. बाबा पायेपोसी व पटिया हाळ व पेश्तर सी चावर
१०. देखील महसूळ कुळबाब कुळकानू मौजे पिंपळेसौदागर देखील महसूळ
११. चावर १ व नख्तयाती त|| ठाणे व त|| देहाय व पाये
१२. पोसी कुळबाब कुळकानू चावर १
१३. नख्त ब|| दिवाबती दर माहाळ जकायेती
१४. दरोज रुके 6३
१५. येणेप्रमाणे ब|| फर्मान हुमायुनु र|| खास व खुर्द्खत ममळकत मदार मळीक
१६. अंबर व भोगवटे वजीरानी व खु|| माहाराज साहेब ब|| सनद शुदा त|| साळ
१७. गु|| सन सबा चाळिळे आहे हाली साळ म|| कारणे दादाजी कोडदेऊ शुबे
१८. दार त्यासी देवाज्ञा जाली म्हणोनु माहाळी कारकून ताजिया खुर्दखताचा
१९. उजूर करितात दंरीबाब नजर एनायेत फर्माउनू सदरहू इनाम जमीन
२०. देहाय गावगना व नख्त रुके तीन दुमाळे करावया रजा होये बिनाबरा इळतमेसी खा
२१. तेरीसी आणौनी माहादभट बिन मुद्गलभट पुरंदरे यासी इनाम दरमा
२२. हाळ बित||
२३. जमीन देहाय गावगना चावर गजशरायनी
२४. तीन ३
२५. मौजे परवती दे|| नख्तयाती व बाजेबाबा मौजे पिंपरी न|| रहाटणी बाबा महसूळे
२६. व पायेपोसी व पटिया हाळ व पेश्तर देखी सी चावर १
२७. ळ महसूळ कुळकानू चा मौजे पिंपळेसौदागर देखीळ महसू
२८. वर १ ळ व नख्तयाती त|| ठाणे व त|| देहाय
२९. व पायेपोसी कुळबाब कुळकानू चावर
३०. १
३१. नख्त ब|| दिवाबती दर माहाळ जकाती प|| म||
३२. दरोज रुके ϭ३
३३. येणेप्रमाणे ब|| फर्मान हुमायुनु र|| खास व खुर्द्खत ममळकत मदार मलिकअंबर
३४. व भोगवटे वजीरानी व खु|| माहाराजसाहेब ब|| सनद शुदा त|| साळ गु||
३५. सन सबा चाळिळे असेली तेणेप्रमाणे मनासी आणौनी दुमाळे करणे दर हर
३६. साळ ताजिया खुर्दखताचा उजूर न करणे तालीक घेऊन असेली इनामदार
३७. मजकुरापासी फिराऊन देणे व रोजमुरा जकाती पैकी इ|| अवळ साळापासु[नु]
३८. घेत जाणे मोर्तब सूद मर्या देयं विरा जते
३९. रुजु सुरु
४०. निवीस
४१. तेरीख २६ माहे रजब
४२. जमादिलाखर सुरु सुद
शि.च.सा. खंड २, लेखांक २०
सनदपत्रातील माहिती पृष्ठ १११, १९ जुलै १६४७
पत्राचा अर्थ:
पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना शिवाजीमहाराजांच्या काचेरीकडून पत्र
१९ जुलै १६४७
महादभट मुद्गल पुरंदरे याने शिवाजीमहाराजांकडे येऊन सांगितले की,
मला पर्वती, पिंपळे सौदागर आणि पिंपरी या प्रत्येक गावात एक एक चावर जमीन याप्रमाणे तीन चावर जमीन आणि पुणे परगण्याच्या जकातखात्यातून दिवाबत्तीकरिता रोज तीन रुके असे इनाम आहे. हे इनाम निजामशाही फर्माने, मलिकअंबराचे खुर्द्खत, वाजीरांनी दिलेली भोगवट्याची पत्रे आणि शहाजीराजांनी दिलेले खुर्दखत यांच्याप्रमाणे शुहूर सन १०४७ पर्यंत चालले आहे. यावर्षी सुभेदार दादाजी कोंडदेव यांना देवाज्ञा झाली म्हणून महालीचे कारकून नवीन खुर्दखत आणा असा आक्षेप घेतात. तरी कृपा करून हे इनाम चालू ठेवण्याची आज्ञा व्हावी.
हि सर्व विनंती शिवाजीमहाराजांना या पत्रात उद्धृत केली आहे आणि गतवर्षीपर्यंत ज्याप्रमाणे हे इनाम चालत आले आहे, त्याप्रमाणे पुढे हि चालू ठेवावे असा हुकुम केला आहे.
दादाजी कोंडदेवांचा मृत्यूचा उल्लेख तारखेप्रमाणे म्हणजे १९ जुलै १६४७ पूर्वी झाला हे या पत्रावरून समजते. दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूचा उल्लेख असलेली शिवाजी महाराजांची तीन पत्रे उपलब्ध आहेत.
(राजवाडे खंड २० लेखांक २३७, शि.च.सा. खंड ३ लेखांक ५३०, खंड ८ लेखांक २१ या प्रत्रांतील उल्लेख करणारी भाषा दादाजी कोंडदेवांविषयी महाराजांना वाटणारा आदर व्यक्त करणारी आहे.)
पत्रावरील टिपा:
१. रवां सुद म्हणजे रवाना झाले. हे रवान शुद या फार्सी वाक्यप्रचाराचा अपभ्रंश आहे.
२. दर म्हणजे आत. दर महाल म्हणजे महालावर, महालात. येथे महाल म्हणजे पुणे परगणा.
३. परवती म्हणजे पुणे शहरातील पर्वती ठिकाण.
४. न|| म्हणजे नजीकचा संक्षेप.
५. बाबा मह्सुलेसी म्हणजे महसूलासंबंधीच्या बाबींसह.
६. लग म्हणजे शून्य, काही नाही.
७. दर महाल जकाती म्हणजे जकातीच्या महालावर, जकातीच्या खात्यावर/तून.
८. रुके म्हणजे चलन, तांब्याचे नाणे – ४८ रुक्यांचा १ टका होत असे.
९. ब|| हा बरहुकुमाचा संक्षेप आहे.
१०. र|| खास हा रख्तखाना शब्दाचा संक्षेप आहे. निजामशाही फर्मानांची सुरुवात अज दिवान रख्तखाना खास शब्दांनी होत असे.
११. ममलकत मदार म्हणजे राज्याचा आधार, हा मलिकअंबराचा किताब आहे.
१२. भोगवटे वजीरानी म्हणजे वाजीरांनी दिलेल्या भोगवट्याच्या खुर्दखताप्रमाणे.
१३. ब|| सनद शुदा म्हणजे झालेले. सनदे नुसार आलेले.
१४. त|| हा तागायत म्हणजे पर्यंत पावेतो या शब्दाचा संक्षेप आहे.
१५. म|| हा मसुरल हजरत किंवा मसुरल अनाम, या उपाध्यांचा किंवा मसुरल (प्रसिद्ध). या शब्दांचा संक्षेप आहे.
१६. रोजमुरा म्हणजे दैनंदिनी, दररोज द्यायची रक्कम.
१७. इ|| हा इस्ताक्बालाचा संक्षेप आहे.
१८. अवल साला पासुनु म्हणजे वर्षारंभापासून, प्रथम असा अर्थ आहे.
साभार: शिवछत्रपतींची पत्रे – डॉ. सौ. अनुराधा गोविंद कुलकर्णी
Review Overview
User Rating!
Summary : सदरचे पत्र अस्सल असून पत्राच्या माथ्यावर प्रतिपच्चंद्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मर्यादेयं विराजते ही समाप्तिमुद्रा आहे, पत्रावरील दोन्ही शिक्के सुस्पष्ट आहेत. पत्राची तारीख २६ जमादिलाखर, सु|| समान अर्बेन अलफ (म्हणजे शुहूर सन १०४८) अशी आहे, खरे जंत्रीप्रमाणे ती १९ जुलै १६४७ अशी येते.
Jay Shivray
Shivaji maharaj purn itihas
Shivaji maharaj purn itihas