शिवाजी महाराजांनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी गनिमी कावा या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे. गनीम हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू गनिमी हे त्या शब्दाचे रूप आहे. कावा या शब्दाला लक्षणेने फसवणूक, धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ ...
Read More »मराठा साम्राज्य
मराठा साम्राज्य इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ पर्यंत भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. शिवाजींनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. इ.स. १६८०मधील शिवाजींच्या मृत्यूनंतर काही काळ अस्थैर्य माजले जे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपले. यानंतर शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी प्रधानमंत्री असलेल्या पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली. पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी पानिपतच्या तिसर्या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव आंग्लांबरोबरील तिसर्या लढाईत पराभूत झाला.