Home » काव्य » शिवकवि कविराज भूषण » शिवकवी कविराज भूषण
शिवकावी कविराज भूषण Shivkavi Kaviraj Bhushan
शिवकावी कविराज भूषण

शिवकवी कविराज भूषण

कवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते.
यांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली.

थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले.
भूषण हे बरेच दिवस आपले थोरले बंधू चिंतामणी यांच्या जवळ राहात असत. पण एक दिवस भावजयीच्या काही दुरूत्तरांमुळे रागावून ते घराबाहेर पडले व त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या विद्वत्तेच्या व कवित्वाच्या जोरावर स्वतःचा उत्कर्ष करून घेतला.

चित्रकूट राजा ऋदयराम सोळंकी यांच्याकडे कविराज गेले असताना, राजाच्या गर्वीष्ठ दानदर्पास झुगारून त्यांनी स्वतःच्या कवितेचे व अस्मितेचे जतन आणि संरक्षण केले. शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून प्रभावित झालेले कविराज उत्तरेहून दक्षिणेकडील सह्याद्रीचे काटे सराटे तुडवीत येऊन महाराजांना भेटले. त्यांनी शिवराजभूषण नावाचा एक अलंकार शास्त्रावरील ग्रंथ लिहिलेला असून त्यात शिवरायांच्या निरनिराळ्या पराक्रमांचे काव्यमय वर्णन अलंकारीक पद्धतीने अविश्कारीत केलेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची आणि कवींची भेट रायगडावर झाली. ते कवी आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी म्हटलं,
आपण कवी आहात? मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का?

कवी भुषणांनी चटकन म्हटलं.. हे राजन,

इंद जिमि जृंभपर। बाढब सअंबपर ।।
रावण सदंभपर। रघुकुलराज है ।।
पवन बारिबाहपर। संभू रतिनाहपर ।।
जो सहसबाहपर। रामद्विजराज है ।।
दावा दुमदंडपर। चीता मृग झंडपर ।।
भूषण वितुंडपर। जैसे मृगराज है ।।
तेज तम अंशपर। कन्नजिमि कंसपर ।।
जो म्लेंछ वंशपर। शेर शिवराज है ।।
शेर शिवराज है।।

मराठी अर्थ:
इंद्र जसा जंभासुरावर,
जमीनीवरचे वादळ जसे आकाशावर,
रावणाच्या लंकेवर जसा रघुकुळाचा राजा प्रभूरामचंद्र चालून गेले होते,
वारा जसा पाण्याने भरलेल्या ढगांवर,
शंकर जसा रतीचा पती मदनावर,
सहत्र क्षत्रियांवर जसा परशुराम चालून गेले होते,
आकाशातली विज जशी लाकडी बुंध्यावर,
चित्ता जसा हरणांच्या कळपावर,
सिंह(मृगराज) जसा हत्तीवर,
प्रकाषाचा किरण जसा अंधार कापतो,
कृष्ण जसा कंसावर,
तसेच शेर शिवराज म्लेंच्छ वंशावर चाल करून गेले आहेत.

English Translation:
Like lord Indra against the demons,
Like underwater volcanic fire over the ocean
Like lord Ram of the raghus clan against boastful ravana,
As strong wind scatters the clouds of rain
As lord Siva destroyed rati’s husband(kaamdev),
and Like parsurama destroyed sahastraarjuna –
Like fire which burns woods,
and a Cheetha on herd of deer ,
Like lion on hogs,
so says Bhushan.
Like a ray of light in darkness,
Like boy Krishna upon kansa,
So has descended king Shivaji ,the Tiger.
upon the clan of mlecchas(barbarians)

अखंड ३५० वर्षं महाराष्ट्राची प्रेरणा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील भव्य ऐतिहासिक मालिका राजा शिवछत्रपती याचे दिग्दर्शक आणि निर्माते श्री. नितीन देसाई (चंदकांत प्रोडक्शन प्रा.लि.) यांनी या मालिकेचे शीर्षक गीत हेच काव्य आहे.

कवी भुषणांचे हे अप्रतिम काव्य ऐकून महाराजांना आनंद झाला, त्यांनी या पाहुण्याचा आदर करून गडावर ठेवून घेतले. या काळात (म्हणजे सुमारे अडीच वर्ष) कवी भूषणांनी महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा अन् विशेषत: युद्धप्रसंगांचा वेध घेतला, हे निश्चित आणि त्यांनी महाराजांच्या जीवनावर काव्यरचना करावयास प्रारंभच केला.

शिवाबावनी हा ग्रंथ त्याच पुस्तकातील एक भाग आहे असे समजतात. हिंदी साहित्यात चंद्रकृत पृथ्वीराज रासा या ग्रंथाच्या तोडीची मान्यता शिवराजभूषणास आहे.

कविराज भूषण कोण? (हे कवि भूषण यांच्याच शब्दांत)

देस न देस न ते गुणीजन आवत, ज्याचन ताही |
तिनमे आयो एक कवि, भूषण कहियतु जायी ||
द्विज कन्नोज कुल कश्यपी, रत्नाकरसुत धीर |
वसत त्रिविक्रमपुर सदा, तरणी तनुजा तीर ||
वीर बीरबल से जहाँ उपजे, कवी अनुभुप |
देव बिहारिश्वर जहाँ, विश्वेश्वर तद्रूप ||
कुल सुलंक चितकुटपती, साहसशील समुद्र |
कवी भूषण पदवी दै, ह्रुदयरामसुत रुद्र ||

अर्थ:
विविध देशातुन त्यांच्याकड़े(शिवराय) गुणीजन येतात
त्यांच्यामधे भूषण म्हणुन एक कवी आला आहे.
कनोजी ब्राह्मण, कुल कश्यप आणि रत्नाकराचा मुलगा
यमुना तीरी असणाय्रा त्रिविक्रमपुरला राहतो.
हा कवी वीर बिरबलाच्या भुमितुन जेथे
बिहारिश्वराचे वास्तव्य आहे तेथून आला आहे.
कुल सुलंक चितकुटपती, साहसशील समुद्र असणाय्रा
राजा ह्रुदयरामाचा मुलगा रुद्र याने भूषण ही पदवी दिलेली आहे.

भुषनांच्या ‘शिवभुषण’ या ग्रंथात ३८२ छंद आहेत. हा खरा अलंकार शास्त्रवारील ग्रंथ आहे.
या ग्रंथाचे नायक शिवराय आहेत. त्यामध्ये १०५ अलंकारांच्या व्याख्या दिल्या आहेत आणि त्यांच्या उदाहरणे स्वतःच सांगितली आहेत.
कविराज भूषण भाट होते; स्तुतिपाठक होते आणि म्हणूनच पुढे ते कोण्या एका राजाच्या दरबारात स्थिरावले नाही. शिवरायांनंतर ते पन्ना नरेश छत्रसाल, कुमाऊ नरेश उद्योत्चंद, श्रीनगर गढवाल नरेश फतहशाह, चित्रकुट नरेश कृदाय्राम सुलंकी, जयपूर नरेश सवाई जयसिंह, रीवा नरेश अवधूतसिंह, बुंदी नरेश रावराजा बुद्धसिंह, सन १७०८ मध्ये सातारा नरेश छत्रपती शाहु महाराज, दिल्ली नरेश जहांगीरशहा, मैडू नरेश अनिरुद्धसिंह, असोथर नरेश भगवंतराय खिची, सन १७२० मध्ये श्रीमंत पेशवे बाजीराव, सन १७२३ मध्ये चिमणाजी आप्पा चिंतामणी यांच्या भेटीला गेल्याचा कवींनी उल्लेख केलेला आहे. कवी भूषण यांचा मृत्यू सन १७५५ मध्ये वृद्धापकाळाने झाला.

संदर्भ: श्री शिवबावनी, जेष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब

कवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते. यांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले. भूषण हे बरेच दिवस आपले थोरले बंधू चिंतामणी यांच्या जवळ राहात असत. पण एक दिवस भावजयीच्या काही दुरूत्तरांमुळे रागावून ते घराबाहेर पडले व त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या विद्वत्तेच्या व कवित्वाच्या जोरावर स्वतःचा उत्कर्ष करून घेतला. चित्रकूट राजा ऋदयराम सोळंकी यांच्याकडे कविराज गेले असताना, राजाच्या गर्वीष्ठ दानदर्पास…

Review Overview

Summary : ३५० वर्षं महाराष्ट्राची प्रेरणा असणारया छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील भव्य ऐतिहासिक मालिका 'राजा शिवछत्रपती' याचे दिग्दर्शक आणि निर्माते श्री. नितीन देसाई (चंदकांत प्रोडक्शन प्रा.लि.) यांनी या मालिकेचे शीर्षक गीत 'इंद जिमि जृंभपर। बाढब सअंबपर ।।' हेच काव्य ठेवले आहे.

User Rating: 3.84 ( 5 votes)

3 comments

 1. Rahul chavan

  आपण कवी भूषण यांनी जन्म तारीख १६१६ सांगता. तसेच त्यांची मृत्यु १७५५ वृद्धापकाळानं झाल्याचे सांगत आहात ते कसे.

  • चूक लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद, आणखी संदर्भ तपासून दुरुस्ती करण्यात येईल

 2. Jay Kavi Bhushan
  Jay Shivaji
  Jay Sambhaji
  Jay Mavalyancha
  Jay Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

Kaviraj Bhushan - Raja ShivChhatrapati

इंद्र जिमि जंभ पर

इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है । पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों ...