इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर,
रावन सदंभ पर, रघुकुलराज है ।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है ।
दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर,
भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है ।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है ।।
– कविराज भूषण
इंद्र जृंभकासुरास, वडवानल सागरास,
गर्वयुक्त रावणास, रघुकुलपति तो बली ।
वायु जसा मेघाला, शंभु जसा मदनाला,
आणि कार्तवीर्याला* राम विप्ररूप तो ।
वणवा जाळी द्रुमांस, चित्ता फाडी मृगांस,
मारी गजपुंगवास जैसा वनराज तो ।
तेज तमाच्या नाशा, कृष्ण जसा वधि कंसा,
म्लेंच्छांच्या ह्या वंशा, शिवराजा काळ हो ।
(कार्तवीर्य= सहस्रार्जुन, मूळ काव्यात ‘सहसबाह’)
Photo Credit: Sachin S. Suryawanshi
Review Overview
User Rating !
Summary : शिवराजभूषण, शिवबावनी, छत्रसालदशक, भूषणहजारा, भूषणउल्हास व दूषण उल्हास. पैकी पहिले तीन उपलब्ध आहेत. भूषण यांचे सर्व काव्य मुक्तक प्रकारातील आहे. रितिकालीन परंपरेप्रमाणे त्यांनी काही कविता लिहिली ; पण त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. भूषण यांची वीररसप्रधान कविता विशेष प्रसिद्ध आहे. युद्धवीर, दयावीर, दानवीर, व धर्मवीर या चारही प्रकारच्या वीरांची वर्णने त्यांनी केली आहेत; पण युद्धवीरांचे वर्णन करण्यात त्यांना अधिक यश मिळाले आहे.