Home » वीर मराठा सरदार » काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड
जावजी लाड

काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड

ऑक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचाड मारीत सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोहोचला. रायगडास त्याने वेढा घातला, ही बातमी समजताच बाजीराव पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. इ.स. १७३४च्या जानेवारी महिन्यात काळ नदीच्या खोऱ्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. हे पाहून गडावरच्या मराठ्यांनाही चेव चडला.
तटसरनौबत जावजी लाड यांनी महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चढविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य काळकाई खिंडी मार्गे सैरावैरा पळू लागले पण जावजी लाड आणि त्यांच्या सैनिकांनी सिद्द्यांचा पाठलाग केला. शत्रु सैन्यास जावजींनी काळकाई खिंडित गाठले पण तेथे सिद्यांची चौकी होती. या चौकीतील सैन्याचे बळ मिळाल्यामुळे सिद्द्याच्या पळणाऱ्या सैनिकांनी उलटून मराठ्यांना तोंड दिले. आता मात्र जावजी लाड आणि त्यांचे वीर घेरले गेले. अखेर घनघोर युद्ध झाले आणि त्यात अनेक जखमा शरीरावर सोसत अतुलनीय शौर्य गाजवत तटसरनौबत जावजी लाड धारातीर्थ पडले.

रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर एक वीर स्मारक दिसते ते सरदार जावजी लाड यांचे आहे असे जेष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब सांगतात.
सरदार जावजी लाड यांचा उल्लेख पेशवा दफ्तरात सुद्धा मिळतो.

ऑक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचाड मारीत सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोहोचला. रायगडास त्याने वेढा घातला, ही बातमी समजताच बाजीराव पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. इ.स. १७३४च्या जानेवारी महिन्यात काळ नदीच्या खोऱ्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. हे पाहून गडावरच्या मराठ्यांनाही चेव चडला. तटसरनौबत जावजी लाड यांनी महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चढविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य काळकाई खिंडी मार्गे सैरावैरा पळू लागले पण जावजी लाड आणि त्यांच्या सैनिकांनी सिद्द्यांचा पाठलाग केला. शत्रु सैन्यास जावजींनी काळकाई खिंडित गाठले पण तेथे सिद्यांची चौकी होती. या चौकीतील सैन्याचे बळ मिळाल्यामुळे सिद्द्याच्या पळणाऱ्या सैनिकांनी उलटून मराठ्यांना तोंड दिले. आता…

Review Overview

इतिहासाचा मागोवा

User Rating !

Summary : अनेक अनामिक वीर आहेत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या, डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत.

User Rating: 3.66 ( 12 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

x

Check Also

थोरले बाजीराव पेशवे - Bajirao Peshwe

रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे

थोरले बाजीराव पेशवे (१८ ऑगस्ट १७०० – २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती ...

तटसरनौबत जावजी लाड

काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड

ऑक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचड मारित सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोचला. गडास त्याने ...