किल्ल्याची ऊंची: 1400
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा: पुणे
श्रेणी: मध्यम
शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव “तोरणा” पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.
पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत. तर दुसर्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.
इतिहास:
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन येथे शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला, त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांनी स्वराज्यसाठी बलिदान दिल्यानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.
पोहोचण्याच्या वाटा:
पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई – बंगलोर हायवे (NH-4) वरील पुण्या पुढील नसरापूर फाटा गाठावा. पुण्या पासून नसरापूर ३६ किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे.
राहाण्याची सोय: नवीन बांधण्यात आलेल्या सदर मध्ये साधारण २० ते ३० लोकांची सोय होऊ शकते. तसेच गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय: जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय: मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
१) वेल्हे मार्गे अडीच तास लागतात. २) राजगड – तोरणा मार्गे ६ ते ८ तास लागतात.
Review Overview
User Rating
Summary : शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव "तोरणा" पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.
Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray छत्रपती शिवाजी महाराज Shivba Shivajiraje Shivprabhu Chatrapati Shivaji Maharaj


Shivaji maharaj yanchy adharavar prashn v uttare pahijet
महोदय छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले
तुम्ही लिहिताना वध झाला असे लिहिले आहे
त्वरित दुरुस्ती व्हावी
चूक दुरुस्त केली आहे, धन्यवाद.