गडे हो ! अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून या दुर्गदर्शनासाठी या. आपापले उद्योग एक्या अंगास सारून या. दो चौ दिसांची सवड काढून या. पण हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे, रान तुडवण आहे, स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा, असतं कळा कळा तापणार ऊनं,असतात मोकाट डोंगरदरे, पण हे ...
Read More »शिवरायांचा मराठा मावळा कसा होता ?
शिवरायांचा मराठा दिसा़यला साधा भोळा, अंगाने रांगडा अन काटक, चेहरा उन्हानं रापलेला, डोक्यावर मुंडासं, गुडघ्या पावतो पैरण, अंगात मळका सदरा, पाठीला ढाल, कमरेला तलवार, पाय आनवाणी, ओठावर तुर्रेबाज मिशा, हनुवटीवर दाढीचे खुट, तोंडात गावरान पण अदबशीर भाषा, चालण्यात मर्दानी ढब, होसला मात्र सह्याद्रीवाणी बुलंद. हातातील तलवार व पाठीवरील ढाली शिवाय त्यांच्याकडे सैनिक असल्याचा कोणताच पुरावा नसायचा, गनिमाने रणभुमीवर ह्यांना लांबून ...
Read More »मराठी भाले
भाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे. याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल (भाल्याचे पाते) या संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला. भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते. भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप होय. हलके व आखूड भाले शत्रूवर फेकता येतात. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता भाल्याचा उपयोग ...
Read More »तलवार
तलवारीचे प्रकार – कर्नाटकी धोप, खंडा (मराठा), राजस्थानी (राजपुती), समशेर (मोगली), गुर्ज, पट्टा, आरमार तलवार, मानकरी तलवार तलवारीच्या मुठीवरूनच सुमारे तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार होतात. मुठी ह्या प्रमुख्याने तांबे, पोलाद, पितळ, हस्तिदंत इत्यादींच्या असतात, तसेच किरच, तेग, सिरोही, गद्दारा, कत्ती इ. उपप्रकार होत. खंडा, मुल्हेरी, फटका हे मराठा तलवारींचे काही प्रकार . तलवारीचे नखा, खजाना, ठोला, परज, गांज्या, अग्र असे ...
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र
शिवकाळात शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते. अफझलखाना विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत, बिचवा यांचा प्रभावी वापर असेल, पावनखिंडीत बाजीप्रभू आणि रायाजी बांदल यांनी पट्टा वापरून केलेली शर्थ असेल किंवा शंभूकाळात चीक्कदेव याच्याविरुद्ध केलेला धनुष्य-बाणाचा वापर असेल. शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे. अश्याच काही शस्त्रांची छोटीशी ओळख करून देण्याचा इथे प्रयत्न ...
Read More »सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण
शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड, राजगड ह्यासारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले. मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. शंकराजी नारायण ...
Read More »मराठा साम्राज्य विस्तार
महाराष्ट्रीय उर्फ मराठी साम्राज्य महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्रीयांचा अम्मल जेथे जेथं होता त्या सर्व प्रदेशाला मिळून महाराष्ट्रीय किंवा मराठी साम्राज्य म्हणतात. तथापि या सर्व प्रदेशावर सातारच्या राजाची अनियंत्रित सत्ता (अकबर, औरंगझेबाप्रमाणें) नव्हती आणि त्याचें मुख्य प्रधान जे पुण्यास रहाणारे पेशवे यांच्या हातीं जरी राज्यकारभाराची मुख्य व्यवस्था होती, तरी साम्राज्यांतील निरनिराळया भागांत मराठयांनी वसाहती स्थापून कोल्हापूरकर व नागपुरकर भोंसले, शिंदे, होळकर, गायकवाड, वगैरे ...
Read More »महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष
स्वराज्यात साडेतीनशे किल्ले आहेत. त्यातला प्रत्येक किल्ला फक्त एक वर्ष जरी लढला तरी स्वराज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाला एक हयात पुरणार नाही. – स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. जे किल्ले सोपे व अतिप्रसिद्ध आहेत त्यावर गडप्रेमी जेव्हा इतिहासाच्या व महाराजांच्या प्रेमाखातर जातात तेव्हा त्यांना “बेगड” प्रेमी लोकांनी करून ठेवलेले उत्पात बघायला मिळतात, या हरामखोर मंडळींनी कोरलेले घाणेरडी रंगरंगोटी पहिली तर कडेलोट किंवा ...
Read More »छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला । शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला ।। वरील दोन ओळींतच खर्या अर्थाने संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो. संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा ...
Read More »शिवकालीन अष्टप्रधानमंडळ
शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली, या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हेच स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते; त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत ...
Read More »