Home » Author Archives: admin (page 6)

Author Archives: admin

वाघनख

Tiger Claws

वाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत लपवण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग ...

Read More »

शिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन

P. K. Ghanekar - प्र. के. घाणेकर

गड-कोट-किल्ले आणि दुर्ग ही आहेत संघर्षाची प्रतीके! शस्त्र सज्ज दुर्गेचे तिथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्रलक्ष्मीचं यज्ञकुंडच! तोफांचे धडधडाट आणि तलवारींचे खणखणाट यांचेच सूर तिथे कानी पडत. रणवाद्यांच्या जल्लोषातच दुर्गांची वास्तुशांत होते. किल्ल्यांच्या सारीपटावर मुत्सद्देगिरीचे फासे तिथे खुळखूळवले जात असत. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या मानवी सोंगट्या हलवूनच विजयी ठरण्याची महत्वकांक्षा तेथे धरली जात असे. अशा किल्ल्यांमध्ये ...

Read More »

मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी

Bharat Etihas Sanshidhak Mandal Pune - भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे

मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ...

Read More »

कट्यार

कट्यार खंजीर

कट्यार हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात प्रचलित असलेले पात्याचे शस्त्र होय. हिला ‘एच’ या रोमन अक्षराच्या (रोमन: H) आकारातली मूठ असते; जेणेकरून शस्त्रधारकाच्या मूठ आवळलेल्या बोटांवरून हिचे पाते सरळ फुटल्यासारखे दिसते. हिच्या संरचनेमुळे लक्ष्याला भोसकण्यासाठी हिचा वार करता येतो. समारंभप्रसंगी गौरवचिन्ह म्हणूनही हिला महत्त्वाचे स्थान आहे. सध्याच्या काळात विवाह सोहळ्यात हिचा वापर केला जातो. उत्तर भारतात जसे मोजड्या पळवतात तसे महाराष्ट्रात ...

Read More »

मोडी बाराखडी

मोडी बाराखडी - MODI Barakhadi

Read More »

दुर्गबांधणीचे शास्त्र

श्री. प्र. के. घाणेकर - P. K. Ghanekar

छत्रपती शिवरायांच्या काळात प्रत्येक दुर्ग मध्यवर्ती सत्तेच्या पूर्णपणे नियंत्रणात असे. कुठल्याही देशमुख – देशपांडे, सरदार – सेनापतीला गढी बांधायला सक्त मनाई होती. प्रत्येक गडावर सरकारी सैन्य असे. त्यावर प्रमुख ३ अधिकारी असत. सबनिस ब्राह्मण जातीचा असे. त्याच्याकडे आयव्ययाची व उपस्थितीची नोंद असे. कारखानीस हा कायस्थप्रभू असे व त्याच्याकड़े रसदीचा विभाग असे. तर किल्लेदार मराठा असे व त्याच्याकडे सेना विषयक अधिकार ...

Read More »

गिरिदुर्गांचे आठ प्रकार

राजगड बालेकिल्ला - Rajgad Fort

तंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरीदुर्गांची माहिती दिली आहे. डॉ. गोडे यांनी या ग्रंथा बाबत तपशीलवार माहिती प्रसिध्द केली आहे. सुई सारख्या निमुळत्या आकाराचा, माणसाच्या आकाराचा, सुपाच्या आकाराचा, मध्ये तुटलेला, वाकडा तिकड़ा, नांगरा सारखा असे किल्ले राजाला राहण्यास योग्य नाहित असे नमूद केलेले आहे. याच ग्रंथात भद्र, अतिभाद्र, ...

Read More »

मराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ

मराठा पायदळ सैनिक - Maratha Soldier

पायदळ हा सुद्धा घोडदळाप्रमाणे मराठ्यांच्या सैन्याचा महत्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदळाची गतिशीलता घोडदळापेक्षा निश्चित कमी होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. युद्धात संख्येने सर्वात जास्त असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत ...

Read More »

अजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू

प्रयागजी प्रभू - Prayagji Prabhu

मोगल म्हणजे भोंगळ! आणि औरंगजेब म्हणजे त्यांचा बादशहा! दख्खन जिंकण्याकरिता त्याने केवढा पसारा मांडला होता! लाखो माणसं, हजारो घोडे, अमाप धान्य, अलोट खजिना, तंबू, दारुगोळा, जनावरं, कापड.. अश्श्याला तोटा नव्हता; फक्त अकलेचाच दुष्काळ होता आणि म्हणूनच वर्षानुवर्ष मराठ्यांच्या मागं धावून सुद्धा शेवटी त्याच्या हाती आली गोळाबेरीज भोपळाच! औरंगजेबाच्या गबाळ्या कारभाराचा फायदा मराठे मात्र भरपूर घेत होते. लुटायला, बनवायला आणि खेळवायला ...

Read More »

पोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक

छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज

छत्रपती संभाजी महाराजांचा गोव्याच्या पोर्तुगीजांशी तह पूर्ण झाला आणि त्याच दरम्यान औरंगजेबाने आपला दूत त्यांच्याकडे रवाना केला. औरंगजेबाने गोवेकरांना मराठ्यांच्या किनारपट्टीवर हल्ले करण्याची सुचना केली. गोव्याच्या फिरंग्याना सुद्धा दक्षिण कोकण हवेच होते, त्यात त्यांना कुडाळच्या सावंताची आणि वाडी वेंगुर्ल्याच्या देसायांची फूस होतीच, म्हणुनच संभाजी महाराजांशी झालेला तह मोडून फिरंग्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचे ठरविले. फोंडा किल्ला लढ़विण्याची जबाबदारी येसाजी कंक आणि ...

Read More »