Home » शस्त्रास्त्रे » दांडपट्टा किंवा पट्टा

दांडपट्टा किंवा पट्टा

दांडपट्टा - Dandpatta दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. तलवारबाजीतील कौशल्याचा सुंदर आविष्कार म्हणजे दांडपट्टा. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई.
सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते मुठीवर चढवता येणाऱ्या चिलखती हातमोजास जोडलेले असते. चिलखती हातमोजा मूठ व कोपरापासून पुढचा हात झाकेल, अश्या बनावटीचे असते. जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषकरून मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा परिणामकारक वापर केला. पट्टा तलवार ही मुख्यत: धातूपासून बनविली जाई.

आज याचा प्रयोग साहसी खेळाच्या प्रदर्शनात केला जातो. हातातली सळसळणारी पाती वापरून अफाट कौशल्य दाखवायचं असतं. सध्या पट्ट्यानं नारळ, केळी, बटाटे कापले जात असले, तरी पूर्वी तोंडात धरलेली लवंग दांडपट्ट्यानं कापली जायची. लवंग धरलेल्याला कसलीच इजा व्हायची नाही. आता जमिनीवर ठेवलेला बटाटा सटकन्‌ कापला जातो; पण पूर्वी माणसाच्या पोटावर ठेवलेले बटाटे, लिंबू सटकन्‌ कापले जायचे. रुमालात ठेवलेली केळी किंवा विड्याची पानं रुमालाला धक्का न लावता कापली जायची. डोळ्याची पापणी हलेपर्यंत हे सारं व्हायचं. पट्ट्यानं वार करणाऱ्याकडे जेवढा आत्मविश्‍वास असतो, तेवढाच तळहातावर नारळ धरून बसणाऱ्याकडेही असतो. दांडपट्ट्याचा, कुऱ्हाडीचा घाव बसून तळहात फाटला, ओठ तुटला असं कधी झालेलं नाही.

दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. तलवारबाजीतील कौशल्याचा सुंदर आविष्कार म्हणजे दांडपट्टा. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते मुठीवर चढवता येणाऱ्या चिलखती हातमोजास जोडलेले असते. चिलखती हातमोजा मूठ व कोपरापासून पुढचा हात झाकेल, अश्या बनावटीचे असते. जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषकरून मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा…

Review Overview

User Rating !

Summary : तलवारबाजीतील कौशल्याचा सुंदर आविष्कार म्हणजे दांडपट्टा. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई.

User Rating: 4.61 ( 5 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

x

Check Also

रायगड

किल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : ...

छत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट

तब्बल 225 करोड़ पेक्षा जास्त रक्कम खर्च करून बनतोय आपल्या महाराजांवर चित्रपट “छत्रपती शिवाजी” नक्की ...

छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र

शिवरायांचे आज्ञापत्र

छायाचित्र साभार महाराष्ट्र वन विभाग

बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६

Get ready to improve your skills in photography. on field basic nature photgraphy workshop on ...

free photography workshop at lohagad

मोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)

Get ready to improve your skills in photography. on field basic nature photgraphy workshop on ...