जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?…..॥१॥
श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?…….॥२॥
त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या……….॥३॥
ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला……….॥४॥
गीतकार: स्वातंत्र्यवीर सावरकर
गायीका: लता मंगेशकर
संगीत: पंडित ह्रुदयनाथ मंगेशकर
निवेदक: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
Credits: सारेगम म्युझिक
Review Overview
User Rating !
Summary : एक थोर साहित्यिक म्हणूनही महाराष्ट्र सावरकरांना ओळखतो. जोसेफ मॅझिनी (इटालियन क्रांतिकारकाचे चरित्र), ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘शिखांचा इतिहास’, ‘माझी जन्मठेप’, ‘सन्यस्त खड्ग’ (नाटक), ‘काळे पाणी’, ‘मला काय त्याचे’, ‘हिंदुत्व’, ‘गोमंतक’ असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’, ‘जयदेव जयदेव जय जय शिवराया’ ही शिवरायांची आरती; ने मजसि ने परत मातृभूमिला, सागरा प्राण तळमळला - यासारखी अजरामर काव्ये लिहिणार्या सावरकरांनी ‘कमला’ हा काव्यसंग‘हही लिहिला.
जय शिवराय,,,,,,,खुप छान माहीती
निश्चयाचा महामेरु।।
खुप छान पेज आहे