तलवारीचे प्रकार –
कर्नाटकी धोप, खंडा (मराठा), राजस्थानी (राजपुती), समशेर (मोगली), गुर्ज, पट्टा, आरमार तलवार, मानकरी तलवार
तलवारीच्या मुठीवरूनच सुमारे तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार होतात.
मुठी ह्या प्रमुख्याने तांबे, पोलाद, पितळ, हस्तिदंत इत्यादींच्या असतात, तसेच
किरच, तेग, सिरोही, गद्दारा, कत्ती इ. उपप्रकार होत.
खंडा, मुल्हेरी, फटका हे मराठा तलवारींचे काही प्रकार .
तलवारीचे नखा, खजाना, ठोला, परज, गांज्या, अग्र असे सुमारे २२ भाग दाखवता येतात.
पाते पोलादी असे, वापरण्यात येणारे पोलाद टोलेडो,चंद्रवट ,हात्तीपागी, फारशी, जाव्हारदार प्रकारचे असते.
तलवार हाताळणे, पवित्रा घेणे, युद्धप्रकार याचे सुमारे ५२ प्रकारचे पवित्रे आहेत.
सासवड जवळील सोनोरी गावाचे मल्हार रामराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केलेली खंडा तलवार सुमारे ४२ किलोचा आहे, अश्या प्रकारची भव्य आणि वजनी अशी एकमेव तलवार भारतात आहे. (हि तलवार युद्धात वापरायची नव्हती)
शिवरायांची भवानी तलवार हि स्पानिश तोलेदो कंपनी मेड आहे असे सांगण्यात येते. पोर्तुगीज सेनापातीकडून खेमसावंत यांच्याकडे आणि त्यांच्याकडून शिवरायांकडे हि तलवार आली असे सांगण्यात येते.
संदर्भ:
श्री.गिरीश जाधवराव (शिवकालीन शस्त्रांचे संकलक)
लॉर्ड इगरटन, रेसिडेंट ग्रांट डफ, विश्वकोश, मायबोली
Review Overview
User Rating !
Summary : कर्नाटकी धोप, खंडा (मराठा), राजस्थानी (राजपुती), समशेर (मोगली), गुर्ज, पट्टा, आरमार तलवार, मानकरी तलवार यांचे ४० उपप्रकार आहेत.
दक्षिणी मुल्हेरी व मराठा धोप madhil farak kay?