Home » वीर मराठा सरदार » शिवरायांचा मराठा मावळा कसा होता ?
शिवरायांचा मावळा - Mavla
शिवरायांचा मावळा - Mavla

शिवरायांचा मराठा मावळा कसा होता ?

शिवरायांचा मराठा दिसा़यला साधा भोळा, अंगाने रांगडा अन काटक, चेहरा उन्हानं रापलेला, डोक्यावर मुंडासं, गुडघ्या पावतो पैरण, अंगात मळका सदरा, पाठीला ढाल, कमरेला तलवार, पाय आनवाणी, ओठावर तुर्रेबाज मिशा, हनुवटीवर दाढीचे खुट, तोंडात गावरान पण अदबशीर भाषा, चालण्यात मर्दानी ढब, होसला मात्र सह्याद्रीवाणी बुलंद.

हातातील तलवार व पाठीवरील ढाली शिवाय त्यांच्याकडे सैनिक असल्याचा कोणताच पुरावा नसायचा, गनिमाने रणभुमीवर ह्यांना लांबून पाहिलं तर त्याला वाटायचं हे यडं गबाळं रूप नुकतच शेत भांगलून आलय हे काय आपला सामना करणार ?

पण हाच मर्द गडी जेव्हा समशेर उपसून रणसंग्रामात झेप घ्यायचा तेव्हा त्याच्या अंगात साक्षात रणमार्तंड संचारायचा, अंगात चित्त्याची चपळाई, नजरेत गरूडाची दाहकता व मनगटात शंभर हत्तींचे बळ घेऊन शत्रूवर चवताळून तुटून पडणारा मर्द मावळ्याचा रौद्र आवतार पाहून शत्रू क्षणार्धात गर्भगळीत झालेला असायचा.

साधीसुधी दिसणारी मराठा पोरं इतकं भयाण रूप धारण करू शकतात हे शत्रूच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर असायचे,
ह्या धक्क्यातून सावरायच्या आतच मराठ्यांच्या पोरांनी गनिमांची अर्ध्याहुनही अधिक फळी उभी चिरून काढलेली असायची.
शिवरायांचा मराठा दिसा़यला साधा भोळा, अंगाने रांगडा अन काटक, चेहरा उन्हानं रापलेला, डोक्यावर मुंडासं, गुडघ्या पावतो पैरण, अंगात मळका सदरा, पाठीला ढाल, कमरेला तलवार, पाय आनवाणी, ओठावर तुर्रेबाज मिशा, हनुवटीवर दाढीचे खुट, तोंडात गावरान पण अदबशीर भाषा, चालण्यात मर्दानी ढब, होसला मात्र सह्याद्रीवाणी बुलंद. हातातील तलवार व पाठीवरील ढाली शिवाय त्यांच्याकडे सैनिक असल्याचा कोणताच पुरावा नसायचा, गनिमाने रणभुमीवर ह्यांना लांबून पाहिलं तर त्याला वाटायचं हे यडं गबाळं रूप नुकतच शेत भांगलून आलय हे काय आपला सामना करणार ? पण हाच मर्द गडी जेव्हा समशेर उपसून रणसंग्रामात झेप घ्यायचा तेव्हा त्याच्या अंगात साक्षात रणमार्तंड संचारायचा, अंगात चित्त्याची चपळाई, नजरेत गरूडाची दाहकता…

Review Overview

User Rating !

Summary : साधीसुधी दिसणारी मराठा पोरं इतकं भयाण रूप धारण करू शकतात हे शत्रूच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर असायचे, ह्या धक्क्यातून सावरायच्या आतच मराठ्यांच्या पोरांनी गनिमांची अर्ध्याहुनही अधिक फळी उभी चिरून काढलेली असायची.

User Rating: 4.14 ( 17 votes)

2 comments

 1. Jay Shivaji
  Jay Sambhaji
  Jay Mavalyancha

 2. jay shivray. ..
  khup abhiman vatto jeva shivcaritra vachto…
  an te aachrnat aananycha praytna karto…
  jau shivray. ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.