राजकारणांचे डावपेच ते बालपणीच शिवरायांकडून शिकले. सुरवातीला त्यांची सावत्रआई सोयराबाई यांनीही खूप माया केली.
शंभुराजे देखणे व शूर होते. राजकारणातील बारकावे भराभर शिकून घेतले. मोगल दरबारातील घडामोडी व राजकारण त्यांना लहान वयात कळाले. वयाच्या ९ व्या वर्षीच शिवरायांनी त्यांना जाणीपूर्वक आग्रा येथे आरंगाजेबाच्या भेटीवेळी नेले होते. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदैतून निसटल्यानंतर संभाजीराजांना तेथेच ठेवून ते निघाले. मोरोपंत पेशव्याचे मेहुणे तेथील होते, त्यांच्या घरी त्यांना ठेवले. मोगली सैनि्कांचा ससेमिरा थांबविण्यासाठी संभाजीराजांच्या निधनाची अफवाही त्यांनी सोडली. स्वराज्यात शिवराय आल्यानंतर काही काळाने शंभुराजे पोचले.
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तोपर्य़ंत संभाजीराजे बारकावे व रणांगणातील डावपेचात तरबेज झाले होते. त्यांनी राज्याभिषेकासाठी आलेल्यांना नम्र स्वभावाने जिंकून घेतले. राज्यभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी राजमाता जिजाऊंचे निधन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे झाले. शिवाजीराजे राजकारण व रणांगणावर गुंतले होते. शंभुराजाकडे लक्ष कोण देणार..त्यांचे शिवरायांच्या दरबारातील अनुभवी मानक-यांशी अनेकदा मतभेद होउ लागले. अमात्य अणणाजी दतो यांच्या कारभाराला शंभुराजाचा सक्त विरोध होता. शिवाजीमहाराजांनी अण्णाजी हे कुशलप्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ठकारभाराकडे दुर्लक्ष केले होते. पण संभाजीराजांना ते मान्य होण्यासारखे नव्हते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले. असे उद्घार काढल्याने ते व मानकरी शंभुराजांवर नाराज होते. सोयराबाई व अण्णाजी दतो यांच्या विरोधामुळे शिवाजी राजांना दक्षिण हिंदूस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. शिवाजीराजांच्या अनुपस्थित संभाजीराजांचा हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळ नकार देत. त्यामुळे महाराजांना कोकणातील शृंगारपुरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना तिकडे पाठवावे लागले.
शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत, राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.
साहित्यिक संभाजीराजे
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत चा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.
बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवराय, आजोबा शहाजी राजे यांची स्तुती यांचा उल्लेख आहे:
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥
अर्थ: कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास.
शहाजी महाराज स्तुती:
भृशबदान्वयसिन्धू सुधाकर: प्रथितकीर्तिरूदारपराक्रम:|
अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव: ||
अर्थ: सर्वशक्तिमान,सामर्थ्थवान असलेला पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ असा राजा किंवा प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेला उदार पराक्रमी आणि अर्थकारण व राजकारणातील धुरंदर अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर राजा गुणसागरातील चंद्राप्रमाणे शोभत होता. असे सिंधु सुधाकरासारखे प्रचंड पराक्रमी,कार्तिवान,उदार शहाजी राजे होऊन गेले.
श्रीशंभूराजे उर्फ संभाजीराजे यांचे सुबक:
तस्यात्मज:शंभुरिति प्रसिद्ध:समस्तसामन्त शिरोवतंस:|
य:काव्यसाहित्य पुराणगीतकोदण्डविद्यार्णव पारगामी ||
अर्थ: अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज (आत्मन्चा अंश) शंभू (राजा) म्हणून प्रसिद्धीस आला.तो काव्य, साहित्य, संगीत,धनुर्विद्या इ.चा कलासागर पार केलेला होता. (पारंगतच झालेला होता.)
क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपति यांचे सुबक:
येनाकर्णविकृष्टकार्मूकचलत्काण्डावलीकर्ति | प्रत्यर्थिक्षितीपालमौलिनिवहैरभ्यर्चि विश्वंभरा||
यस्यानेक वसुंधरा परिवृढ प्रोत्तुंग चूडामणे: | पुत्रत्त्वं समुपागत: शिव इति ख्यात पुराणो विभु: ||
अर्थ: ज्यांनी वैर करणाऱ्या महिपालांची (अनेक राजांची)गर्वोन्मत मस्तके (मुंडमाला) विश्वंभरास अर्पण केली,अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यांमध्ये,उत्तुंग व श्रेष्ठ असणाऱ्या,पुत्र ‘शिव’म्हणून पुराणांतरींचा प्रभु अंशावतार जन्मास आला. त्या शहाजीराजांना, महाशूर मुलखाचे धनी असलेले,लोकांना पर्वतासारखे(हिमालय)उत्तुंग म्होरके वाटणारे,पुराणातील पुरूषश्रेष्ठ, शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले.
संदर्भ: विकिपीडिया
Review Overview
User Rating!
Summary : अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती संभाजी महाराज उत्तम साहित्यिक आणि संस्कृत चा उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. लहानपणीच कवी कलश, महाकवी भूषण, गागाभट्ट यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने तसेच आपले पिता शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानितीशास्त्रपर रचला असावा. ग्रंथाचा सुरुवातीला शहाजी राजे, शिवाजी राजे यांची स्तुती आहे. एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती, राज्य व्यवस्था, कर्तव्ये, मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत. संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू, शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या. त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे, ब्रज भाषेतील सातसतक, नखशिख, नायिकाभेद हे ग्रंथ उपलब्ध आहेत. मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला.
Chhatrapati Sambhaji Raje ek thor Granthalekhak hote, Tasech te buddhiman hote, Te Sarva shaktiman hote, Te Shatrusathi akramak hote, Te Chhatrapati Shivji Rajyan sarkhe Rayatevar prem karat hote.
Tarihi tyana kahi lekhakani badnam kele
Pan tyanchya DHARMAVEER balidanane he siddha hote ki te khare Dharmpremi hote
Hindavi Swarajya sathi tyani balidan dile
Lokan pasun ata tyancha thorpana lapun rahile nahi
Hya pudhe tyana konihi badnam karu naka
Shivpremi ani Shambhupremi tyana sodnar nahit
Jay Shivaji
Jay Sambhaji
Jay Mavalyancha
Jay Maharashtra
Jay Hind