Home » मोडी शिका » कालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने

कालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने

जुन्या मराठी कागदपत्रांमध्ये शुहूर सन (अरबी कालगणना) फक्त अक्षरात लिहिलेला असते. त्याकरिता संख्यावाचक अरबी शब्द वापरलेले असतात. मराठी कागदपत्रांत ते मोडी लिपीत लिहिलेले आढळतात. इंग्रजांचे राज्य सुरु झाल्यानंतरही बराच काळ अरबी कालगणना वापरात होती. सुहूर सन, फसली सन व हिजरी सन अशा तीन प्रकारांमध्ये ती पहावयास मिळते. पेशवे काळातील पत्रात सुहूर सनातील कागद प्रामुख्याने समोर येतात. सुहूर सनात साधारणतः ५९९ ते ६०० वर्षे मिळवल्यावर इसवीसन मिळते. मोडी पत्रांमध्ये महिनेही अरबी अक्षरात असतात. मोडी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी अंक आणि बारा महिने खाली दिले आहेत. तसेच जुन्या कागदपत्रांमध्ये साधारणतः कालगणना सुहूर सनात असते व ती अक्षरांमध्ये दिसून येते.

सनाचे अरबी अंक डावीकडून उजवीकडे एकक, दशक, शतक, सहस्त्र असे वाचले जातात. यातील अलफ म्हणजे हजार हे बऱ्याच ठिकाणी अलफे असे लिहिलेले आढळते तरी मूळ शब्द अलफ असाच आहे. मराठी कागदपत्रांमध्ये अशर ऐवजी असर आणि इसरीन ऐवजी अशरीन, असरीन किंवा इसरैन असेही लिहतात. अहद या संख्यावाचक शब्दाऐवजी त्याचे इहिदे हे मराठी रूप येते. मोडी वाचता येणे हा पूर्णतः सरावाचा भाग आहे.

अरबी अंक - arab numbers
१ = इहीदे
२ = ईसने
३ = सलास
४ = अर्बा
५ = खमस
६ = सीत
७ = सबा
८ = समान
९ = तीसा
१० = अशर
२० = अशरीन
३० = सलासीन
४० = अर्बेन
५० = खमसैन

६० = सीतैन
७० = सबैन
८० = समानीन
९० = तीसैन
१०० = मया
२०० = मयातैन
३०० = सलास मया
४०० = अर्बा मया
५०० = खमस मया
६०० = सीत मया
७०० = सबा मया
८०० = समान मया
९०० = तीसा मया
१००० = अलफ
अरबी महिने - arab months
१ = मोहरम
२ = सफर
३ = रबिलावल
४ = रबिलाखल
५ = जमादिलावल
६ = जमादिलाखर
७ = रज्जब
८ = साबान
९ = रमजान
१० = सवाल
११ = जिल्काद
१२ = जिल्हेद
शुहूर सनाची संख्या लिहिताना अक्षरांमध्ये प्रथम एकं स्थानाचा आकडा, मग दहं स्थानाचा आकडा, मग शतक स्थानाचा आकडा, अशा क्रमाने लिहितात.

उदाहरणार्थ:
अर्बा खमसैन तिसामिया = ४ + ५० + ९०० = ९५४
अर्बेन अलफ = ४० + १००० = १०४०
खमस अर्बेन मयातैन अलफ = ५ + ४० + २०० + १००० = १२४५

राज्याभिषेक शक - Rajyabhishek Shak
जेष्ठ शुद्ध १३, शक १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला, या दिवसापासून राज्याभिषेक शक १ या वर्षास सुरुवात झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी नवीन कालगणना सुरु केली तरी राज्याभिषेक शकाचा मोडी कागदपत्रात उपयोग नियमित झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतरच्या काही पात्रांवर राज्याभिषेक शक घातलेला असतो आणि काही पात्रांवर पूर्वीप्रमाणे शुहूर सन घातलेला असतो. शिवाजी महाराजांच्या अष्ठप्रधानांपैकी मोरेश्वर पंडितरायांच्या पत्रांवर राज्याभिषेक शक घातलेला दिसतो. शिवरायांच्या नंतरच्या छत्रपतींच्या कारकिर्दीतही स्वतः छत्रपती आणि त्यांचे पंडितराय यांच्याच पात्रांवर राज्याभिषेक शक घातलेला दिसतो.

राज्याभिषेक शक पत्रांचा मायना ठराविक पद्धतीचा असतो. प्रथम स्वस्ति श्री हे मांगल्यसूचक शब्द, मग राज्याभिषेक शक, संवत्सराचे नाव, महिना, पक्ष, तिथी व वार अशा क्रमाने तारीख, मग क्षत्रियकुलावतंस या उपाधीपुढे छत्रपतींचे नाव, त्यानंतर ‘याणी’ हा शब्द आणि त्यापुढे पत्र ज्याला लिहिले असेल त्याचे नाव, पद आणि मग यांसी आज्ञा केली यैसी जे अशा स्वरूपाचा मजकूर असतो.

जुन्या मराठी कागदपत्रांमध्ये शुहूर सन (अरबी कालगणना) फक्त अक्षरात लिहिलेला असते. त्याकरिता संख्यावाचक अरबी शब्द वापरलेले असतात. मराठी कागदपत्रांत ते मोडी लिपीत लिहिलेले आढळतात. इंग्रजांचे राज्य सुरु झाल्यानंतरही बराच काळ अरबी कालगणना वापरात होती. सुहूर सन, फसली सन व हिजरी सन अशा तीन प्रकारांमध्ये ती पहावयास मिळते. पेशवे काळातील पत्रात सुहूर सनातील कागद प्रामुख्याने समोर येतात. सुहूर सनात साधारणतः ५९९ ते ६०० वर्षे मिळवल्यावर इसवीसन मिळते. मोडी पत्रांमध्ये महिनेही अरबी अक्षरात असतात. मोडी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी अंक आणि बारा महिने खाली दिले आहेत. तसेच जुन्या कागदपत्रांमध्ये साधारणतः कालगणना सुहूर सनात असते व ती अक्षरांमध्ये दिसून येते. सनाचे अरबी अंक डावीकडून उजवीकडे…

Review Overview

User Rating!

Summary : भारत इतिहास संशोधक मंडळातील सोपे कागद लिप्यंतर करून सोपी मोडी पत्रे हे उत्यंत उपयुक्त पुस्तक श्री. मंदार लवाटे आणि सौ. भास्वती सोमण यांनी प्रकाशित केले आहे, नजीकच्या काळात सोप्या कागद पत्रांप्रमाणेच कठीण हस्ताक्षरांचे व इंग्रजी काळातील मोडीचे पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे.

User Rating: 3.39 ( 9 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

Bharat Etihas Sanshidhak Mandal Pune - भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे

मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी

मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो ...