सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा । लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥
लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून । वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥
चाल
जिजाबाई आमचं दैवत । मोठं जागृत । स्फूर्ति ती देत । आजही सार्यात महाराष्ट्रास ।
दुसरें दैवत नाहीं आम्हांस । तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥
चाल
गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी करण्याला । उत्सुक झाली होती जिजाई, ध्यास लागला जीवाला ॥
चाल
राजमाता जिजा महशूर । दिगंतावर । केला तिनं थोर । महाराष्ट्राचा राजा शिवराय । दुस्मान करी सदा हाय हाय । धन्य ती जिजा आपुली माय ॥
चाल
शिवनेरीला जन्म जाहला शिवाजीचा त्या वेळेला । महाप्रतापी बाळ जन्मला, आनंदाला भर आला ॥
जिजाबाई देई शिक्षण शिवाजी बाळाला ॥
रामायण महाभारत शिकवी ती त्याला ॥
दुष्टांचा नाश करण्याला । रामकृष्ण अवतार झाले शिकवलं त्याला ॥
लहानाचा मोठा बाळ झाला । अन्यायाची चीड ये त्याला ।
देवधर्म साधुसंताचा भक्त तो झाला ॥१॥
जिजाबाई आणि शिवराय गेले पुण्याला ॥
दादोजी कोंडदेव होते गुरुजी त्याला ॥
हिंदवी राज्य करण्याचा संकल्प केला ॥
तवां बोलला बाळ आईला । आई आशीर्वाद दे मला । रोहिडेश ठेवला साक्षीला । आणि हिंदवी राज्य करण्याच्या घेतलं शपथेला ॥
जिजाबाई बोलली त्याला । बाळा ! आशीर्वाद हा तुला । जगदंबा तुझ्या पाठीला । भारी होशिल कळिकाळाला । शिवशंकर यश देणारा । धन्य धन्य माता ती धन्य बाळ तो झाला ॥२॥
शिवाजीचं मन तिनं भारलं थोर पराक्रम करण्याला । राजा शिवाजी तिनं घडविला, राज्य हिंदवी करण्याला ॥
संकटं आली मोठमोठालीं शिवरायावरती जेव्हां । पुढेंच जा तूं, मागें सरुं नको, माता बोलली हो तेव्हां ॥
देवी भवानी प्रसन्न तुजला देईल यश तुज चौफेर । तूं सिंहाचा बच्चा, लांडगे कसे तुला रे धरणार ॥
चाल
चालून आल अफझलखान । केली त्याचा दाणादाण ॥
चालून आला फाजलखान । निसटून गेला वीर महान ॥
चालून आला शास्ताखान । बोटं छाटून केला म्लान ॥
सिंह आग्र्याला सांपडला । तेथूनी पण सुटुनी आला ॥
कैक संकटें प्राणघातकी शिवबावरती जरि आली । तरी न माता डगमगली ॥३॥
चाल
धीर देत ती पुढे चालली । शिवराज्याभिषेक सोहळा तिनं पाहिला । तृप्त झाला मातेचा डोळा ॥
चाल
शहाजी राजे नव्हते परि ते सौख्य सोहळा बघण्याला । मनांत येऊन खिन्न जाहली वीरपत्नीा ती त्या वेळां ॥
पंधरा दिवस ही पुढें न जगली इहयात्रा ती संपविली । जगदंबेचे नांव घेऊनी परलोकीं निघुनी गेली ॥
चाल
पाचाड गांवी अंत तो झाला । रायगडाच्याच पायथ्याला । धन्य शहाजी धन्य जिजाई धन्य शिवाजी जगिं झाले । मायबाप ही धन्य पुत्र हा धन्य असे जगतीं झाले ॥
घरांघरांतून दर्शन होईल जिजामातेचें ते जेव्हां । भरभराट होईल देशाची निश्चित जन हो मग तेव्हां ॥
जिजाई व्हावें जगांत तुम्ही आयाबहिणींनो ही विनति । पांडुरंग शाहीर जाहला कीर्ति गावया सिद्धमति ॥४॥
कल्याणचा खजिना लूट (शपथ घेतली शिवराजानं राज्य हिंदवी करण्याची)
ठकास महाठक (महाठक ठका भेटला अजब युक्तीला)
वीररत्न तानाजीराव मालुसरे (स्वातंत्र्यसंगरीं अर्पुनि शिरकमलाला, स्वातंत्र्यदेविच्या पदीं लीन जो झाला)
ताब्यात आला गड परी सिंह तो गेला! (तानाजीचा आणखी एक पोवाडा)
प्रतापगडचा रणसंग्राम (धन्य! धन्य! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार)
वीरमणि बाजीप्रभु देशपांडे (धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार)
राजमाता जिजाबाई (सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा)
शाहिस्तेखानाचा पराभव (नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान)
शिवप्रतिज्ञा (शिव छत्रपतीची कीर्ती। गाऊ दिनराती । येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला )
शिवरायांचे पुण्यस्मरण (पन्नास वर्षे अखंड झुंजुनि राज्य हिंदवी स्थापियलें)
संभाजी महाराजांचा पोवाडा
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पोवाडा
नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पोवाडा
झाशीच्या राणीचा पोवाडा
Review Overview
User Rating !
Summary : पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर (२८ डिसेंबर, इ.स. १९०३) हे प्रसिद्ध पोवाडेकार होते. स्वतःचे लिहिलेले पोवाडे ते रंगमंचावर गाऊन सादर करीत.
Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray छत्रपती शिवाजी महाराज Shivba Shivajiraje Shivprabhu Chatrapati Shivaji Maharaj

