Home » भ्रमंती » शिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन

शिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन

P. K. Ghanekar - प्र. के. घाणेकर

गड-कोट-किल्ले आणि दुर्ग ही आहेत संघर्षाची प्रतीके! शस्त्र सज्ज दुर्गेचे तिथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्रलक्ष्मीचं यज्ञकुंडच! तोफांचे धडधडाट आणि तलवारींचे खणखणाट यांचेच सूर तिथे कानी पडत. रणवाद्यांच्या जल्लोषातच दुर्गांची वास्तुशांत होते. किल्ल्यांच्या सारीपटावर मुत्सद्देगिरीचे फासे तिथे खुळखूळवले जात असत. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या मानवी सोंगट्या हलवूनच विजयी ठरण्याची महत्वकांक्षा तेथे धरली जात असे. अशा किल्ल्यांमध्ये ‘ शिवनिर्मित दुर्ग ‘ आपल्या वैशिष्ट्यांनी वेगळे उठून दिसतात. त्यातही सागरी किल्ले आणि डोंगरी किल्ले येथे राबविलेले शास्त्रीय दुर्गबांधणीचे प्रयोग या शिवदुर्गांवर अवतरले आहेत. त्यांची साक्षेपी-डोळस नोंद आपण घेतली पाहिजे.

ज्या काळात महाराष्ट्रात अभियांत्रिकी किंवा स्थापत्याचं पद्धतशीर शिक्षण देणाऱ्या संस्था नव्हत्या; राजकीयदृष्ट्या कशाचीच खात्री देता येत नव्हती; दुर्गबांधणीत वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याइतकी स्वस्थता तर नव्हतीच, पण आर्थिक पाठबळही अपुरंच होतं; अशा वेळी स्वकीय नि परकीय शत्रूंशी झट्या घेता घेता, शिवाजीमहाराजांचे असे अद्वितीय शास्त्रीय पायावर अवलंबून असणारे दुर्गबांधणीचे प्रयोग चालू होते, हे अधिक आश्चर्यकारक मानायला हवं.

शिवाजीमहाराजांचा जन्म १६३०चा, त्यांच्या आरंभीच्या स्वराज्यस्थापनेच्या हालचाली १६४५ च्या आसपासच्या. शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक १६७४चा आणि आकस्मित मृत्यू १६८०चा. अशा उण्यापुऱ्या ५० वर्षांच्या आयुष्यातील पहिली १५ वर्षे वगळता, अवघ्या ३५ वर्षांमध्ये विजापूरकर, आदिलशाही, दिल्लीची मोगल सत्ता, पोर्तुगीज-ब्रिटीश आदी पाश्चात्य सत्ता, सिद्दीसारखे आफ्रिकन हबशी अशा अनेकांशी दोन हात करीत, तब्बल साडेतीनशे किल्ले असणारं हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं, हे काही साधं सोपं काम नाही. याच काळात शिवराय स्वधर्म-स्वभाषा आणि स्वदेश यांचा आग्रह धरीत राज्यव्यवहार कोश, करनकौस्तुभ असे अनेक ग्रंथ तज्ञांकडून लिहवून घेत होते, साल्हेर-अहिवंतापासून चंदी-जिंजी तंजावरपर्यंत राज्यविस्तार करीत होते, हेही महत्वाचे.

दगडावर दगड ठेवून कोणीही तटबंदीयुक्त किल्ले उभारू शकतं. पण दूरवर विचार करून, सर्व गोष्टींचा कार्यकारणभाव लक्षात घेऊन, विशेषज्ञान (विज्ञान) वापरून दुर्गउभारणी फक्त शिवाजीमहाराजाच करताना दिसतात. त्यांची खरी थोरवी हीच आहे. असे ‘ विज्ञाननिष्ठ शिवराय ‘ आजही आम्हाला एकविसाव्या शतकात दिपगृहासारखे मार्गदर्शक ठरतील, यात नवल ते काय?
जगामध्ये अन्य कोणत्याही सत्ताधीशाने ही अशी विज्ञानावर आधारित दुर्गरचना केल्याचं आढळत नाही.

संदर्भ:
शिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन – प्र. के. घाणेकर

गड-कोट-किल्ले आणि दुर्ग ही आहेत संघर्षाची प्रतीके! शस्त्र सज्ज दुर्गेचे तिथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम-बुलंद-बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्रलक्ष्मीचं यज्ञकुंडच! तोफांचे धडधडाट आणि तलवारींचे खणखणाट यांचेच सूर तिथे कानी पडत. रणवाद्यांच्या जल्लोषातच दुर्गांची वास्तुशांत होते. किल्ल्यांच्या सारीपटावर मुत्सद्देगिरीचे फासे तिथे खुळखूळवले जात असत. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या मानवी सोंगट्या हलवूनच विजयी ठरण्याची महत्वकांक्षा तेथे धरली जात असे. अशा किल्ल्यांमध्ये ' ' आपल्या वैशिष्ट्यांनी वेगळे उठून दिसतात. त्यातही सागरी किल्ले आणि डोंगरी किल्ले येथे राबविलेले शास्त्रीय दुर्गबांधणीचे प्रयोग या शिवदुर्गांवर अवतरले आहेत. त्यांची साक्षेपी-डोळस नोंद आपण घेतली…

Review Overview

User Rating

Summary : दगडावर दगड ठेवून कोणीही तटबंदीयुक्त किल्ले उभारू शकतं. पण दूरवर विचार करून, सर्व गोष्टींचा कार्यकारणभाव लक्षात घेऊन, विशेषज्ञान (विज्ञान) वापरून दुर्गउभारणी फक्त शिवाजीमहाराजाच करताना दिसतात. त्यांची खरी थोरवी हीच आहे. असे ' विज्ञाननिष्ठ शिवराय ' आजही आम्हाला एक्विसाच्या शतकात दिपगृहासारखे मार्गदर्शक ठरतील, यात नवल ते काय ? जगामध्ये अन्य कोणत्याही सत्ताधीशाने ही अशी विज्ञानावर आधारित दुर्गरचना केल्याचं आढळत नाही.

User Rating: 4.03 ( 10 votes)

3 comments

  1. Sanchit Galole

    अप्रतिम गुरुजी, मला वाचायला पुस्तक हव्या आहेत, कृपया मार्गदर्शन करा.
    में नागपुर च रहिवासी आहे. मुलीला घड़वायच आहे !

    • आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तूर्तास ऑनलाईन पुस्तके वितरण बंद केलेले असल्याने आपण bookganga esahitya amazon अशा साईट वरून पुस्तके मागवू शकता.

  2. Dr Ghanekar . Do you arrange botanical trips around June I would like to join pl reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

श्री. प्र. के. घाणेकर - P. K. Ghanekar

दुर्गबांधणीचे शास्त्र

छत्रपती शिवरायांच्या काळात प्रत्येक दुर्ग मध्यवर्ती सत्तेच्या पूर्णपणे नियंत्रणात असे. कुठल्याही देशमुख – देशपांडे, सरदार – सेनापतीला गढी बांधायला सक्त ...

राजगड बालेकिल्ला - Rajgad Fort

गिरिदुर्गांचे आठ प्रकार

तंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरीदुर्गांची माहिती दिली ...