|| सरनौबतस्तु सेनानी: || अशी समर्पक व्याख्या देत राज्यव्यवहारकोशात सरनौबताचे वर्णन आले आहे. सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी. घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे. दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत. हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे ...
Read More »जेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय दरम्यान सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्यावर बिजापुरच्या पश्चिमेकडिल पठाणंची फळी गारद करण्याची जबाबदारी महाराजांनी सोपविली होती. येलबुर्ग्याला हंबीरावांनवर पठाणाची प्रचंड फौज चालून आली. अब्दुलरहीमखान मियान स्वतः आघाडीच्या हत्तीवर बसून या फौजेचे नेतृत्त्व करीत होता. पण या पठानांच्या सेना सागराला पाहून मराठे किंचित सुद्धा घाबरले नाहीत, उलट युद्ध गर्जना करीत ते शत्रुवर तुटून पडले. मराठ्यांचा आवेश असा ...
Read More »काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड
ऑक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचड मारित सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोचला. गडास त्याने वेढा घातला; ही बातमी समजताच बाजीराव पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. जानेवारी १७३४ महिन्यात काळ नदीच्या खोर्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. गडावरच्या मराठ्यांनाही चेव चडला. तटसरनौबत जावजी लाड यांनी महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चडविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य सैरावैरा पळू ...
Read More »चला माहिती घेऊया गडकोटांविषयी
गिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून महाराष्ट्रात गडकोट वैभव विपुल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले. दुर्गमता हा गडाचा गाभा होता, शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई. नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले.मग दगडाची रचाई ...
Read More »सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण
शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७ व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड , राजगड ह्यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले. मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. ...
Read More »दांडपट्टा किंवा पट्टा
दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. तलवारबाजीतील कौशल्याचा सुंदर आविष्कार म्हणजे दांडपट्टा. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले ...
Read More »मराठे – निजाम संबंध
दक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासातील अठराव्या शतकातील मराठे – निजाम संबंध आणि संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजामुल्मुल्क हा गाजीउद्दीन हाताखाली तयार झालेला एक युद्धकुशल सेनापती होता. त्याला मोगल दरबारातून फतेहजंग खानदौरान, चिनकिलीच खान, निजाम-उल्मुल्क आसफजाह अशी विविध बिरूदे मिळाली होती. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मोगली सत्तेच्या कमकुवतपणाचा फायदा उठवून निजाम-उल्-मुल्क इ.स. १७२४ मध्ये दक्षिणेत आपली स्वतंत्र सत्ता ...
Read More »मराठ्यांची कीर्ती काव्यरुपात
समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी । रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।। घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले । तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले । खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले । बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी । रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ।। या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची । ...
Read More »मराठेशाहीतील स्त्रियांची पत्रे
मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. ही पत्रंच आज महत्त्वाचे दस्तावेज आहेत. इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र-वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अस्सल पुराव्याखेरीज इतिहास रचला जाणार नाही. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून ...
Read More »मोडी लिपी काय आहे?
मोडी लिपी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बालबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ई्स्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यानी केली. उर्दूप्रमाणे ...
Read More »