Home » Author Archives: admin (page 8)

Author Archives: admin

छत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल

छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांसोबत - Chhatrapati Shivaji Maharaj with Mavale

प्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत. मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती. मंत्रशक्ती म्हणजे राजा आणि त्याचे प्रधानमंडळ यांचे राजनैतिक नैपुण्य आणि परिस्थिति – काळानुरूप निर्णय घेण्याची शक्ती. उत्साहशक्ती म्हणजे राजा, प्रधानमंडळ आणि त्यांचे सैन्य हे किती पराक्रमी आहेत, त्यांच्या अंगीभूत शौर्य किती आहे, ह्यावर अवलंबून असलेली शक्ती. तर प्रभुशक्ती म्हणजे राजाची आणि राज्याची कोश (खजिना) आणि सैन्य (लश्कर) यांची ...

Read More »

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

छत्रपती राजर्षी शाहू महाराज - Chhatrapati Rajarshri Shahu Maharaj

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजीं राजांच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले, सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, ...

Read More »

इंद्र जिमि जंभ पर

Kaviraj Bhushan - Raja ShivChhatrapati

इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है । पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है । दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है । तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है ।। – कविराज भूषण इंद्र जृंभकासुरास, ...

Read More »

आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग

आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग - Anandrao Dhulap

सुभेदार सुभा आरमार, आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग Anandrao Dhulap. Admiral of Maratha Empire at Vijaydurg.

Read More »

इस्ट इंडियामन व्यापारी जहाज

इस्ट इंडियामन व्यापारी जहाज - East Indiaman Ship

हे आहे एक ‘इस्ट इंडियामन’. अशाच प्रकारच्या व्यापारी जहाजांवर बसून इंग्रज, डच, आणी फ्रेंच भारतात आले. या जहाजात मालासोबत तोफखानाही असे, तसेच एक तुकडी शिबंडीची असे. जेणेकरून, समुद्रावर शत्रूशी गाठ पडल्यास त्याच्याशी मुकाबला केला जाऊ शकतो. एका जिद्दी कॅप्टनच्या हाताखाली एक इंडियामन बऱ्याच भारतीय प्रकारच्या गलबतांना झुंझत ठेऊ शकतो. शिवकाळात, इंडियामन जहाजांना भारताच्या कोणत्याच राज्याने लढाईत जिंकले नाही आणी अशाच ...

Read More »

सरखेल कान्होजी आंग्रे

सरखेल कान्होजी आंग्रे - Sarkhel Kanhoji Angre

कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे ...

Read More »

महाराणी ताराबाई

महाराणी ताराबाई - Maharani Tarabai

दिनांक ३ मार्च, १७०० रोजी एैन धामधुमीच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते. छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे सत्ता कोणी सांभाळायची असा पश्न निर्माण झाला. यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. आपला मुलगा शिवाजीस गादीवर बसवले व राज्याची सर्व सुत्रे हातात घेतली. धामधुमीच्या काळात राज्यातच ...

Read More »

छत्रपती राजाराम महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी, १६७० रोजी पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी १५ मार्च १६८० रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले होते. जानकीबाईंच्यानंतर राजाराममहाराज यांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ...

Read More »

वीर शिवा काशीद

शिवा काशीद - Shiva Kashid

वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत ...

Read More »

बाजीप्रभू देशपांडे

Bajiprabhu Deshpande

बाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट १६१५ रोजी सिंध, ता. भोर, जि. पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे बाजी सरनोबत होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज ...

Read More »