Home » Author Archives: admin (page 9)

Author Archives: admin

आज्ञापत्रांतील दुर्ग प्रकरण

गडकोटांचे महत्व

संपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें ? याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हें राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो ...

Read More »

सैन्याची संरचना

मराठा सैन्य

या युद्धपद्धतीमध्ये शिवछत्रपतींनी महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीचे विशेषत: किल्ल्यांचे महत्त्व ओळखून अनेक नवीन किल्ले बांधले व जुन्यांची डागडुजी केली; तसेच प्रत्येक किल्ल्यावर हवालदार नेमून त्याच्या हाताखाली एक सरनोबत, एक सबनीस, एक फडणीस आणि एक कारखानीस असे भिन्न जातींचे अधिकारी नेमले. याशिवाय किल्ल्याच्या अगदी लगतच्या परिसरात बंदोबस्तासाठी रामोशी, परवारी, महार, मांग, बेरड वगैरे मेटकरी नेमलेले असत. प्रत्येक किल्ल्यावर दारूखाना, अंबारखाना व पाण्याची ...

Read More »

राजमाता जिजाबाई आऊसाहेब

Mrinal Kulkarni as Rajmata Jijau

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता! कर्तृत्व मनगटात उतरण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं. मडक्याचा आकार कुंभाराच्या हातांवर आणि त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर, कल्पनाक्षमतेवर अवलंबून असतो. कर्तृत्ववान पुरुषांचही हेच सूत्र आहे. बालपणापासून ज्याला वाघ दिसला की झेप घेऊन त्याच्याशी त्याच्याच त्वेषानं लढावं ही ...

Read More »

राजमाता जिजाबाई (पोवाडा)

राजमाता जिजाऊ आऊसाहेब

सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा । लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥ लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून । वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥ चाल जिजाबाई आमचं दैवत । मोठं जागृत । स्फूर्ति ती देत । आजही सार्यात महाराष्ट्रास । दुसरें दैवत नाहीं आम्हांस । तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥ चाल गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी ...

Read More »

शिवकवी कविराज भूषण

शिवकावी कविराज भूषण Shivkavi Kaviraj Bhushan

कवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते. यांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले. भूषण हे बरेच दिवस आपले ...

Read More »

दुर्गदुर्गेश्वर रायगड

महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी ...

Read More »

शहाजीराजे मालोजीराजे भोसले

Shahaji Raje Bhosale - शहाजीराजे भोसले

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे व्यक्तिमत्त्व! जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा ...

Read More »

महात्मा जोतीराव फुलेंचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा

Mahatma Jotirao Phule

कुळवाडी – भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा || लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा | काळ तो असे यवनांचा || शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा | असे तो डौल जाहागिरीचा || पंधराशे एकूणपन्नास साल फळले | जुन्नर तें उदयास आले || शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले | जिजाबाईस रत्न सापडले || हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले | ज्यांनी ...

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा – शाहीर नानिवडेकर

Shahir Mahadev Nanivadekar

शाहीर महादेव नारायण नानिवडेकर (१९०४-१९६२) यांचा जन्म किरसूळ, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी १९२१ मध्ये मॅट्रिकची परीक्षा पूर्ण करून पुढील शिक्षण पुणे इंजिनियरिंग कॉलेज येथे पूर्ण केले. नकला करणे आणि दांडपट्टा चालवण्याचे खेळ करून त्यांनी “दांडपट्टा बहाद्दर” म्हणून लंडनपर्यंत नावलौकिक मिळवले होते. शाहिरी, पोवाडे गाणे आणि पारंपारिक संगीताचे धडे प्रसिद्ध शाहीर लाहिरी हैदर, दाजी मंग यांच्याकडे गिरवले. मराठी लावणीचे ...

Read More »

शिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे

Historian Vasudev Sitaram Bendre - Shivray

जेव्हां लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री.बेंद्रे ह्यांना संधी मिळाली तेव्हां अशी साधने तपासतांना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एकअतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र “शिवाजी महाराजांचे” चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते. या वरून त्याच ...

Read More »