“शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून, त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण, स्पष्ट आणि तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते.”
– कोस्मा दी गार्डा
“शिवाजीने उत्तरेस दमण आणी खाली गोवा ह्या आमच्या दोन्ही प्रदेशामधला सर्व मुलुख काबीज केला आहे. हिंदुस्थानच्या हा अँटिला(प्रख्यात हूण नेता) च्या चातुर्याची आणी पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. तो केवळ बचावाचेच खेळ खेळतो असे नव्हे तर चढाईचेही खेळतो.”
– गोव्याचा व्हाईसराँयने पोर्तुगालच्या राजास लिहिलेले पत्र २४ जानेवारी १६८०
“शिवाजीचे डोळे अतिशय तीक्ष्ण व विलक्षण तेजस्वी आहेत. त्याची बुद्धीमत्ता त्यातुन व्यक्त होते. तो दिवसातून एकच वेळ सामान्यतः भोजन करतो. तरीही त्याचे आरोग्य उत्कृष्ट आहे.”
-जिन दि तेवनो
“स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत.”
– डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार)
“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे.”
– प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड)
(दुर्ग-खंड पहिला पुस्तकातुन)
धन्य जालो ही वेबसाईट पाहून आणि वाचून हि