स्वराज्य स्थापन करणारे छत्रपति शिवाजी महाराज, ती संकल्पना मनी बाळगणारे शाहजी राजे आणि राजमाता जिजाऊ, महाराजांच्या मृत्यु नंतर सुलतानी शक्तिला समर्थपणे तोंड देणारे छत्रपति संभाजी महाराज आणि त्यांच्या अमानुष हत्येनंतर रायगड लढ़विणाऱ्या राणी येसूबाई, जिंजीहून मोगली फौजांचा धुव्वा उडविणारे छत्रपति राजाराम महाराज आणि त्यांच्या पश्च्यात बादशाहची स्वप्ने धूळीस मिळविणाऱ्या महाराणी ताराराणी, मराठ्यांच्या स्वातंत्र लढ्यानंतर बाजीराव पेशव्यांची दिल्ली धडक, चिमाजी अप्पांची वसई मोहिम आणि नानासाहेबांच्या कारकिर्दीत अटकेपार झेंडे रोवले, हे सगळे शक्य झाले कारण मराठी वीरांच्या अतुलनिय पराक्रमामुळे.
यातील मोजक्याच योध्यांची नावे, त्यांचा पराक्रम आपल्यास ठाउक आहे. घोड़ेखिंड पावन करणारे बाजीप्रभु देशपांडे, महाराजांचे रूप घेउन सिद्दीच्या छावणीत जाणारे नरवीर शिवा काशिद, पुरंदर लढ़विणारे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड काबिज करताना धारातीर्थी पडणारे तानाजी मालुसरे, बहलोल खानांस मोजक्या सैनिकानिशी सामोरे जाणारे सेनापति प्रतापराव गुजर, मोगली घोड्यांना पाण्यात दिसणारे संताजी आणि धनाजी आणि असे अनेक.
पण आजही कैक अनामिक वीर आहेत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या व डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत, ते सर्वानासमोर येणे आज जरुरी आहे.
इ.स. १७०३ चा पावसाळा संपला आणि पुण्याला छावणीकरुन राहणारा बादशाह राजगडाच्या रोखाने निघाला. राजगडाचा रस्ता तयार करण्यासाठी हजारो कामगार सतत दोन महिने झटत होते. बादशाह राजगडांस येउन वेढा घालून बसला. हमिद्दुधीन खान आणि तरबियत खान यांच्यावर किल्ला काबिज करण्याची जबाबदारी बादशाहने सोपविली होती. मोगली फौजेने दमदमे उभारून गडावर तोफांचा मारा सुरु केला. खुद्द औरंगजेबाची छावणी सुवेळा माची समोर होती. गडाच्या शिबंदिवर संताजी सिलीम्बकर होते. राजगड परक्रमाने लढ़वित असताना संताजी स्वामीकार्यावर ठार झाले. आज सुवेळा माचीच्या ताटातील गणेश शिल्पासमोरील वीरगळ ही संताजी सिलीम्बकर यांची असावी.
संताजी सिलीम्बकर यांचा पराक्रमाची साक्ष देणारे ताराराणी यांचे एक पत्र आहे.
या व्यतिरिक्त राजवाडे यांनी सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाची साधने यात संताजिंच्या पराक्रमाचा दाखला दिला आहे.
Review Overview
इतिहासाचा मागोवा
User Rating !
Summary : आजही कैक अनामिक वीर आहेत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या व डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत, ते सर्वानासमोर येणे आज जरुरी आहे.
अप्रतिम माहीती