Home » वीर मराठा सरदार » सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण
मराठमोळा

सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण

शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते.
पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड, राजगड ह्यासारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले.

मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. शंकराजी नारायण यांच्या हाताखालच्या रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव व पंताजी शिवदेव या शूर मराठ्यांनी रात्री माळा लावून सिंहगडात प्रवेश केला. अचानक हल्ला करुन तेथील मोगली शिबंदी कापून काढली. सिंहगडाचा राजपूत किल्लेदार देवीसिंह कैद झाला आणि अश्याप्रकारे सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला. पण दुर्दैवाने आज आपण या विरांच्या शौर्याला विसरतो.

संदर्भ: महाराणी ताराबाई कालीन कागदपत्र आणि शिवचरित्र प्रदीप यात मिळतो.

शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड, राजगड ह्यासारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले. मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. शंकराजी नारायण यांच्या हाताखालच्या रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव व पंताजी शिवदेव या शूर मराठ्यांनी रात्री माळा लावून सिंहगडात प्रवेश केला. अचानक हल्ला करुन तेथील मोगली शिबंदी कापून काढली. सिंहगडाचा राजपूत किल्लेदार देवीसिंह कैद झाला आणि अश्याप्रकारे सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला. पण दुर्दैवाने…

Review Overview

User Rating !

Summary : आजही कैक अनामिक वीर आहेत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या व डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत, ते सर्वानासमोर येणे आज जरुरी आहे.

User Rating: 2.85 ( 2 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.